Header AD

मुंब्रा आणि शिळ - दिव्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार विरोधी पक्षनेत्यांना डॉ. विपीन शर्मांचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त देशमुख ठेवणार देखरेख
ठाणे (प्रतिनिधी) कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी ठेकेदारांनी कामे प्रलंबित ठेवली आहेत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा ठेकेदार, अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्यांना समज देण्यात येईल, असे आश्वासन ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी दिली.          नगरसेवक निधीअभावी अनेक विकास कामे रखडली आहेत. अर्थसंकल्पाची व्यवस्थीत अमलबजावणी केली जात नाही. आदी विषयांच्या संदर्भात विरोधी पक्षनेते अशरफ पठाण यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शानू पठाण यांनी, सध्या युटीडब्ल्यूटीचे काम सह्याद्री, मल:निस्सारणाचे काम के. ई इन्फ्रा; वॉटर रिमॉल्डींगचे काम शयानो; अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम सागर साई या ठेकेदारांकडून सुरु आहे. मात्र, नेहमीप्रमाणे या ठेकेदारांनी कामे अर्धवट ठेवली आहेत. या संदर्भात विचारणा केल्यास ते अश्लाघ्य भाषेत बोलत आहेत.            त्यांच्यावर कारवाई करावी; नगरसेवक निधी नगरसेवकांना देऊन त्यांच्या प्रभागातील विकासकामांना सुरुवात करावी; नगरसेवकांच्या समस्या महासभेत ऐकून घ्याव्यात; कौसा येथील रुग्णालय तत्काळ सुरु करावे, शिळ- दिवा दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम आणि दिवा येथील नाल्याचे बांधकाम तत्काळ करावे, आदी मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या. आयुक्तांनीही हे सर्व विषय गांभीर्याने घेतले असून या संदर्भात लवकरच ठेकेदारांना बोलावून त्यांना समज देण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, प्रलंबित कामे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्या देखरेखीखाली पूर्णत्वास नेण्यात येतील, असे आश्वासन दिले.              आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर शानू पठाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पठाण यांनी, “ अनेक महिन्यांपासून आपण नगरसेवक निधीचा पुरेपुर विनियोग व्हावा, अशी मागणी करीत आहोत. त्याच अनुषंगाने आपण आयुक्तांची भेट घेतली होती. आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून अर्थसंकल्पाची प्रभावी अंमलबजावणी, ठेकेदारांची़ मनमानी रोखणे आदींबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे,” असे सांगितले.            दरम्यान, ठाण्यातील नालेसफाई ही धूळफेक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सर्वप्रथम आपणच ही नालेसफाई “हात की सफाई” असल्याचे म्हटले होते. अजूनही वेळ गेलेली नाही. अधिकार्‍यांनी जर वेळीच लक्ष घातले तर ठाणे तुंबणार नाही, असेही यावेळी पठाण यांनी साांगितले.

मुंब्रा आणि शिळ - दिव्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार विरोधी पक्षनेत्यांना डॉ. विपीन शर्मांचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त देशमुख ठेवणार देखरेख मुंब्रा आणि शिळ - दिव्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार विरोधी पक्षनेत्यांना डॉ. विपीन शर्मांचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त देशमुख ठेवणार देखरेख Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

गांधी जयंती दिनी सेवानिवृत्त कर्मचा-यांचे आमरण उपोषण निवृत्त्ती वेतनासाठी 'आफ्रोह'च्या वतीने मुक निदर्शने

कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या कर्मचा-यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्ष होत आली तरीही  त्यांना निवृत्तीवेतन...

Post AD

home ads