Header AD

इंधन दरवाढी विरोधात कल्याण मध्ये कॉंग्रेसचे आंदोलन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. याचाच निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.


आज देशावरती कोरोना महामारीचे मोठे संकट असूनही केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्वांचा निषेध करण्यासाठी कल्याण शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली बैल बाजार येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


ह्या वेळी प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णीयुवक अध्यक्ष मनीष देसले, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, विमल ठक्कर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इंधन दरवाढी विरोधात कल्याण मध्ये कॉंग्रेसचे आंदोलन  इंधन दरवाढी विरोधात कल्याण मध्ये कॉंग्रेसचे आंदोलन Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads