Header AD

केंद्रातील सरकारने वेळीच ओ.बी.सी.जनगणना करायला पाहिजे होती ; भानुदास माळी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग 

ठाणे , प्रतिनिधी  : केंद्र सरकारकडे वांरवांर मागणी करूनही ओ.बी.सी.ची जनगणना करण्यात आली नाही,दिवंगत खासदार राजीवजी सातव यांच्यासमवेत अनेक खासदारांनी संसदभवनात ओ.बी.सी.जनगणनेची मागणी केली होती,परतू केद्र सरकारने या कडे दुर्लक्ष केले आहे असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ.बी.सी.चे अध्यक्ष भानुदास माळी यांनी ठाण्यात बोलताना सांगितले .            महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष भानुदास माळी साहेब यांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यांतील जिल्हास्तरीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी व ठाणे शहर व प्रदेश स्तरावरील नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात चर्चा करण्यासाठी भानुदास माळी यांनी आज ठाणे काँग्रेस कार्यालयास ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट दिली.या प्रसंगी ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.              या प्रसंगी बोलताना भानुदास माळी यानी  ओबीसींच्या भविष्यातील वाटचालीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत बोलताना सागितले की,केंद्र सरकारने वेळीच ओबीसींची जनगणना केली असती तर आरक्षणाचा प्रश्न इतका जटिल झाला नसता.ठाण्यात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे,काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून त्यांचापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राहील व यामुळे ठाणे काँग्रेस मजबूत होईल असे यावेळी बोलताना माळी यांनी सांगितले.        या वेळी ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी बोलताना ओबीसी समाजास असलेल्या विविध अडचणी,तसेच शासनाच्या विविध योजनांपासून अजूनही दुर्लक्षित राहिलेला आहे त्यांच्यासाठी काय केले पाहिजे हे सांगत त्यानी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला.         यावेळी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, माजी नगरसेवक गटनेते संजय घाडीगावकर,ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे ,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,प्रदेश ओ.बी.सी.चे उपाध्यक्ष सुरेश खेडे पाटील,काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे,आदिवासी विभागाचे अध्यक्ष विश्वनाथ किरकिरे ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे ,श्रीकांत गाडीलकर ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक,विजय बनसोडे,रवींद्र आंग्रे,माजी नगरसेविका शीतल अहेर,रवि कोळी,मिलिंद कोळी,राकेश पूर्णेकर,सखाराम पाटील,पप्पू अठवाल,श्रीकांत कांबळे,गणेश गावडे,जालिंदर ससाणे,समिर शेख,शाहीदा मोमीन, यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रातील सरकारने वेळीच ओ.बी.सी.जनगणना करायला पाहिजे होती ; भानुदास माळी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग केंद्रातील सरकारने वेळीच ओ.बी.सी.जनगणना करायला पाहिजे होती  ;  भानुदास माळी अध्यक्ष  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads