Header AD

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा केली हत्या

 डोंबिवली ( शंकर जाधव )  अनैतिक संबधातून पत्नीने प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने या हत्येचा छडा लावत     पत्नी,तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा पेट्रोलपंपाचे मागील मानपाडा गांवातील प्रविण धनराज पाटील हे हरवल्याची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात ४ जून रोजी केली होती.

            पाटील यांची पत्नी लक्ष्मी पाटील यांची पोलिसांनी चौकशी केली असता प्रवीण पाटील घरातुन गेल्यापुर्वी १ जून  व २ जून रोजीबाबत खोटी व असमाधानकारक माहिती देत अअसल्याचा संशय आला. अरविंद उर्फ मारी रविद्र राम व लक्ष्मी पाटील यांच्यात अनैतिक प्रेमसबंध असून प्रविण पाटील यांचे लक्ष्मीवर संशय घेत होते.


        २ जून रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास प्रविण पाटील यांना राहत्या घरी लक्ष्मी पाटीलअरविंद उर्फ मारी रामसनी सागर यांनी  हाताबुक्कांनीलोखंडी राॅडने मारहाण करुन गळा आवळला. त्यानंतर प्रवीण पाटील यांच्या गळयावर वार करुन जिवे ठार मारले. प्रवीण पाटील यांच्या हत्येतील पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह रिक्षाने शेलु गांवाजवळ बदलापुर-कर्जत रोडवर मोरी खाली फेकून दिला होता. 

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा केली हत्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा केली हत्या Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads