Header AD

उंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार

 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली वनविभागाच्या जागेची पाहणी...कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री संत सावळाराममहाराज वनश्री धामटाणभालदावडीसोनारपाडाउंबार्ली येथील वनविभागाच्या जागेची पाहणी केली. येथील वातावरण पक्ष्यांना पोषक असून या जागेवर मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांचा अधीवास असल्यामुळे पक्षी अभयारण्य म्हणूनच हे ओळखले जात आहे. या पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असून या अभयारण्याचा अधिक प्रमाणात विकास करता येईलयासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.उन्हाळ्यामध्ये येथील पक्ष्यांची तहान भागावी व त्यांना पाण्याची सोय व्हावी याकरिता यापूर्वीच या पक्षी अभयारण्यात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५ हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बसविण्यात आल्या आहेत. आता पावसाळा सुरु झाला असून जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन करुन ते अडवून पाणी संवर्धन करण्याच्या दृष्टिने दोन बंधारे बांधण्याच्या तसेच येथे अस्तित्वात असलेला बंधाऱ्यातून पाणी झिरपत असल्याने त्याची डागडूजी करण्याच्या सूचना यावेळी केल्या. या जागेवर अधिक वृक्ष लागवड करणे तसेच येथील पक्षी व वृक्षांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या अभयारण्याला संरक्षक भिंत बांधण्याबाबत सूचना देखील यावेळी खासदारांनी केल्या.

उंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार उंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads