Header AD

वंजारी सेवा समिती तर्फे गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण तर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी वंजारी भवन कल्याण येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.


यावेळी संस्थेचे खजिनदार प्रा रामनाथ दौंड यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांनी गोपीनाथ मुंढे यांच्या स्मृतींना उजाळा देऊन श्रध्दांजली अर्पण केली. तसेच यावेळी मोहन नाईकज्ञानेश्वर धात्रक, आत्माराम फड, गंगाधर गरकल, अर्जुन उगलमुगले, माधव दराडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.


गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी, ऊसतोड कामगार, त्याच बरोबर बहुजन समाजाच्या सर्वागीण विकासास चालना देण्यासाठी दिलेले योगदाना मुळेच जनतेने त्यांना लोकनेता ही उपाधी दिली आहेआणि ते शेवट पर्यंत लोकांसाठी संघर्ष करीत राहिले असा थोर नेता आपल्याला आच्यानक सोडून गेला ज्यामुळे खऱ्या अर्थाने वंजारी समाज पोरका झाला आहे अशी खंत प्रत्येकाने आपल्या मनोगतात व्यक्त केली. कोरोनाच्या पर्श्र्वभूमीवर मर्यादित  लोकांच्या उपस्थितीत सर्व नियम पाळून सदर कार्यक्रम करण्यात आला.


वंजारी सेवा समिती तर्फे गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन वंजारी सेवा समिती तर्फे गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads