Header AD

इंडियन मेडिकल असोसिएशनच्य डॉक्टरांचा संरक्षण कायद्याच्या दिरंगाई मुळे काळ्या फिती लावून निषेध

        

 डोंबिवली ( शंकर जाधव ) गेल्या काही दिवसात असे बरेच हल्ले भारतातील विविध राज्यात डॉक्टरांवर  झाले. आसाम मधे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या चित्रफिती मध्ये हे हल्ले किती भयानक आणि अमानुष आहेत हे उघडपणे दिसले.सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब कठोर पावलं उचलणे आवश्यक आहे.
         कठोर असा केंद्रीय कायदा सरकारने त्वरित आणावा. हल्लेखोर समाजकंटकांवर जलद न्यायालयात सुनावणी होऊन कठोर कारवाई व्हावी.या समाजकंटकांना जामीन मिळू नये अशी तरतूद या कायद्यात असावी. रूग्णालय आणि दवाखाने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावी अशी मागणी करत संरक्षण कायद्याच्या दिरंगाईमुळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे काळ्या फिली लावून निषेध नोंदविला.


 

 

           इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी आपल्या रुग्णालयात रुग्नासेवा देत असताना काळ्या फिती लावून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.याबाबत डॉ. मंगेश पाटे म्हणाले, भारतात स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत ९० आरोग्यसेवा टक्के  ही खाजगी क्षेत्रातील डॉक्टर्स देत आले आहेत. कोविड च्या भयानक महामारी दरम्यान सुध्दा खाजगी क्षेत्रातील रूग्णालयांनी प्रचंड काम केले आहे. आजही देशातील डॉक्टर्स आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
        

        आपला परिवारजबाबदार्‍या या मागे टाकून डॉक्टर्स रूग्णसेवा देत आहेत. हे काम करतांना १५०० पेक्षा ही जास्त डॉक्टर्स मृत्यूमुखी पडलेत. कितीतरी डॉक्टरांना  उपचार करतांना स्वतःलाच कोरोनाची लागण झाली.कितीतरी डॉक्टर्स मृत्युच्या दारातून परतले.ह्या स्थितीतही डॉक्टर्स नेटाने आणि जीव तोडून आपले काम करत आहेत. असे असतांना देशात विविध भागात रूग्णालयांवर आणि डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. दमदाटी करणेअर्वाच्च भाषा वापरणे इथपासून ते जीवघेणी मारहाण करणेपर्यंत हे हल्ले होत आहेत. आजपर्यंत हे सर्व डॉक्टरांनी  सहन केले.
      पण आता सहनशीलतेची मर्यादा पार झाली आहे. आसाममध्ये डॉ. दत्ता या वरिष्ठ डॉक्टरांवर  असाच प्राणघातक हल्ला झाला आणि त्यांचा त्या हल्ल्यात मृत्यु झाला.गेल्या काही दिवसात असे बरेच हल्ले भारतातील विविध राज्यात डॉक्टरांवर झाले. आसाममधे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या चित्रफिती मध्ये हे हल्ले किती भयानक आणि अमानुष आहेत हे उघडपणे दिसले.सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब कठोर पावलं उचलणे आवश्यक आहे. 
        कठोर असा केंद्रीय कायदा सरकारने त्वरित आणावा. हल्लेखोर समाजकंटकांवर जलद न्यायालयात सुनावणी होऊन कठोर कारवाई व्हावी.या समाजकंटकांना जामीन मिळू नये अशी तरतूद या कायद्यात असावी.रूग्णालय आणि दवाखाने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावी. अलिकडेच रामदेव या योग गुरूंनी डॉक्टरांची आणि आधुनिक उपचार पद्धतीची अपमानास्पद खिल्ली उडवली.मृत डॉक्टरांबद्दल त्यांनी हीन वक्तव्य करून त्यांचा अपमान केला. ह्या रामदेव वर सरकार कारवाई का करत नाही हे अनाकलनीय असल्याचे डॉ.पाटे यांनी सांगितले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्य डॉक्टरांचा संरक्षण कायद्याच्या दिरंगाई मुळे काळ्या फिती लावून निषेध इंडियन मेडिकल असोसिएशनच्य डॉक्टरांचा संरक्षण कायद्याच्या दिरंगाई मुळे काळ्या फिती लावून  निषेध Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads