Header AD

हिपी’ने झी बांग्लाच्या ‘डान्स बांग्ला डान्स’शी हात मिळवणी केली
मुंबई, १६ जून २०२१ : भारताचा प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म हिपीने (HiPi) भरपूर मनोरंजन प्रदान करण्यासाठी झी बांग्लाच्या बहुप्रतीक्षित डान्स रियालिटी शो (डान्स बांग्ला डान्स) शी हातमिळवणी केली आहे. आपल्या ‘डान्स हिपी डान्स’ प्रोग्रामचा एक भाग म्हणून हिपी अॅपवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांना इंटरॅक्टिव्ह कंटेंटचा नियमित डोस देण्यात येईल. यातून भविष्यात आपल्या प्रेक्षकांसाठी झी जे विविध डान्स रियालिटी शोज सादर करेल, त्यांच्याशी टाय-अप करण्याचाही प्रयत्न करण्यात येईल.         डान्स बांग्ला डान्स झी बांग्लावर १२ जूनपासून परतले आहे आणि पुढील २२-२४ आठवडे त्यातून मनोरंजनाचा ओघ सुरू राहील. हिपी अॅपच्या माध्यमातून प्रेक्षक द्केहिल या रियालिटी शोचा एक भाग होऊ शकतात. दर आठवड्याला मजेशीर हुक स्टेप चॅलेंज द्वारे आपले नृत्याकौशल्य दाखवून ते रोख बक्षिसे जिंकू शकतात. डान्स बांग्ला डान्सचे स्पर्धक देखील हिपीवरच्या या साप्ताहिक स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात व अशाप्रकारे हिपी अॅपवर आपल्या प्रोफाइलमधून ते प्रेक्षकांना ऑफ-स्क्रीन मनोरंजन प्रदान करू शकतात.         झी डिजिटल पब्लिशिंगचे सीईओ आणि हिपीचे सीबीओ श्री रोहित चड्ढा म्हणाले, “मनोरंजनाचा दर्जा उंच ठेवणारा मापदंड नक्की करण्यासाठी स्पर्धा आणि चुरशीद्वारे देशभरातील युझर्सपर्यंत आपला प्लॅटफॉर्म पोहोचवत हिपीने बरेच मार्गक्रमण केले आहे. डान्स बांग्ला डान्सशी हातमिळवणी एक मजेशीर उपक्रम आहे, जो देशातील सृजनशील लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी देतो. यातून प्रेक्षकाचे मनोरंजन कसे असावे याची व्याख्या होईल.”

हिपी’ने झी बांग्लाच्या ‘डान्स बांग्ला डान्स’शी हात मिळवणी केली हिपी’ने झी बांग्लाच्या ‘डान्स बांग्ला डान्स’शी हात मिळवणी केली Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads