Header AD

हनुमान नगर, दुर्गानगर प्रभागात ओपन जिमचे लोकार्पण

 

■नगरसेविका हेमलता कैलास पावशे यांच्या प्रयत्नांना यश...


कल्याण ,कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. १०१ हनुमान नगर, दुर्गानगर प्रभागात नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे नगरसेविका हेमलता कैलास पावशे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.  


       गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. कोरोनापासून बचावासाठी चांगल्या प्रतिकारशक्तीची आवश्यकता असून हि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नागरिक अनेक प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून व्यायामाला देखील मोठे महत्त्व असून अनेक जण व्यायामशाळेत जाऊन व्यायाम देखील करत असतात. मात्र अनेकांना व्यायामशाळेत जाणे शक्य होत नाही. विशेषकरून महिला आणि जेष्ठ नागरिक यांना व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे जमत नाही. नागरिकांची हि समस्या लक्षात घेऊन नगरसेविका हेमलता पावशे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रभागात ओपन जिम सुरु करण्यासाठी निधी मंजूर करून घेतला.


         पावशे यांच्या पाठपुराव्यामुळे या ओपनजिमचे काम पूर्ण झाले असून रविवारी या जिमचे लोकार्पण देखील करण्यात आले. प्रभाग क्र. १०१ मधील प्रिया अपार्टमेंट, मल्हार पार्क, वसंत पार्क, देवऋषी टॉवर, राजाराम टॉवर, कृष्णा व्हिला आदी परिसरातील नागरिकांना या ओपनजिमचा लाभ घेता येणार आहे. प्रभागातील जेष्ठ नागरिक, महिला आदींना सकाळ, संध्याकाळी अथवा त्यांच्या वेळेप्रमाणे याठिकाणी व्यायाम करता येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका हेमलता पावशे यांचे आभार मानले आहेत.

              

              दरम्यान यावेळी नगरसेविका हेमलता पावशे, समाजसेवक कैलास पावशे, रदनेश पावशे, गोविंद भोईर, गणेश पावशे, चंद्रकांत पावशे, सुभाष चौधरी, मुकेश पावशे, संदीप नाईक, द्त्त्ताराम कोतोडेकर, संजय वारके, सुगम धुमाळ, राम काकड, नरेंद्र चौधरी, महेंद्र मोरे, संदीप ठुबे आदीजण उपस्थित होते.    

हनुमान नगर, दुर्गानगर प्रभागात ओपन जिमचे लोकार्पण हनुमान नगर, दुर्गानगर प्रभागात ओपन जिमचे लोकार्पण Reviewed by News1 Marathi on June 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads