Header AD

फेसबूकचा हिंदु द्वेष या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद

 

■मोदी सरकारने फेसबूकला पर्याय स्वदेशी अ‍ॅप विकसित करावे – टी. राजासिंहभाजप आमदारतेलंगणा...कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मेक इन इंडियाच्या धर्तीवर भारत सरकारने फेसबूकप्रमाणे स्वदेशी अ‍ॅप विकसित केले पाहिजेअसे आवाहन भाजपचे तेलंगणा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित फेसबूकचा हिंदुद्वेष’, या ऑनलाईन विशेष परिसंवादात ते बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर ८,६८४ लोकांनी पाहिला. या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन ट्विटरवर -#Facebook_Suppress_Hindu_Voices* या नावाने चालवलेल्या टे्रंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात ७२ हजार ट्वीटस् करून नागरिकांनी फेसबूकचा निषेध केला. फेसबूकवरील या अन्याय बंदीच्या विरोधात ५ हजार लोकांनी ऑनलाईन पिटीशन साईन केली.देशातील हिंदुत्ववादी संघटनांना सोशल मिडिया चालवणार्‍या विदेशी आस्थापनांकडून लक्ष्य केले जात आहे. फेसबूककडून त्यांची पाने बंद केली जात आहेततर ट्विटरकडूनही भारताच्या उपराष्ट्रपतींचेतसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अधिकृत खात्याचे ब्ल्यू टीक’ काढले जाते. सुदर्शन न्यूज सारख्या वाहिनीचेही पान बंद केले जाते. मी लोकप्रतिनिधी असतांनाही माझे फेसबूकवर खाते उघडण्यावर बंदी घातली गेली आहे. दुसरीकडे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा डॉ. झाकीर नाईकहिंदूंना संपवण्याची भाषा करणारे अकबरूद्दीन ओवैसीपाकिस्तानमधील अनेक आतंकवादी संघटना यांची मात्र फेसबूकट्वीटर आदि समाजमाध्यमांवरील खाती राजरोसपणे चालू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झालीतरी आपल्यावर विदेशी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य करीत असल्याची टीका देखील टी. राजसिंह यांनी केली.टाइमसारख्या विदेशी प्रसिद्धी माध्यमाने अहवाल दिला म्हणून फेसबूकने सनातन संस्थासनातन प्रभातसनातन शॉप यांच्यासह अनेक फेसबूक पाने बंद केली आहेत. कोणतेही ठोस कारण नसतांना भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हस्तक्षेप करून अशा प्रकारे निवडक पाने बंद केली जात असतीलतर फेसबूकवरच सरकारने बंदी आणावीअशी आमची मागणी असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितले.

फेसबूकचा हिंदु द्वेष या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद फेसबूकचा हिंदु  द्वेष  या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads