Header AD

शाकाहारी असलात तरी आवश्‍यक प्रथिने मिळवा अपेक्षा एकबोटे एमएससी. आरडी प्रमुख आहारतज्ञ, नेफ्रोप्‍लस
मुंबई - १५ जून २०२१ :-  प्रथिने हा डायलिसिस उपचारामधील महत्त्वपूर्ण घटक आहे. डायलिसिसच्‍या प्रतिसत्रादरम्‍यान व्‍यक्‍तीमधील ८ ते १६ ग्रॅम किंवा सरासरी प्रथिने कमी होतात. डायलिसिस उपचार घेत असलेल्‍या व्‍यक्‍तींनी हे कमी झालेले प्रमाण भरून काढण्‍यासाठी दररोज शरीराच्‍या वजनाच्‍या प्रतिकिग्रॅ १.२-१.५ ग्रॅम प्रथिने सेवन केले पाहिजे. बहुतांश शाकाहारी व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या आहारामधून आवश्‍यक प्रथिने मिळणे अवघड होऊन जाते.            शाकाहारी व्‍यक्‍ती विशिष्‍ट आहाराचे सेवन करतात, ज्‍यामध्‍ये फक्‍त वनस्‍पती आधारित आहाराचे सेवन केले जाते. शाकाहारी व्‍यक्‍ती मांस किंवा अंडी खात नाहीत. तुम्‍ही शाकाहारी आहात आणि तुम्‍हाला क्रोनिक किडनी डिसीज (सीकेडी) आहे किंवा डायलिसिस उपचार सुरू केला आहात तर आवश्‍यक प्रथिने मिळवण्‍यासाठी मांस सेवन करण्‍याची गरज नाही.         बहुतांश शाकाहारी प्रथिने स्रोत फॉस्‍फरस किंवा पोटॅशियमने संपन्‍न असतात, पण ते सेवन करणे टाळणे गरजेचे नाही. तुम्‍ही आहारासह योग्‍य प्रमाणात फॉस्‍फरसचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. शाकाहारी स्रोतांमध्‍ये अंडी किंवा मांस सारख्‍या मांसाहारी पदार्थांत असलेल्‍या उच्‍च प्रमाणातील प्रथिने नसतात, पण योग्‍य प्रमाणात शाकाहारी स्रोतांचे सेवन केल्‍यास आवश्‍यक प्रथिने मिळण्‍यामध्‍ये मदत होईल.           शाकाहारी व्‍यक्‍ती प्रथिने अधिक प्रमाणात मिळण्‍यासाठी खालील स्रोतांचा आहारामध्‍ये समावेश करू शकतात: सोया किंवा सोया उत्‍पादने जसे सोया दूध, सोया फ्लेक्‍स, मील मेकर, तोफू इत्‍यादी. दुग्‍धउत्‍पादने (प्रतिदिन ३०० मिलीपर्यंत निर्बंधित) सर्वात महत्त्वाचे पनीर सोयाबीन व डाळ (भिजवलेल्‍या) कडधान्‍ये शेंगा (सोललेल्‍या)फक्‍त आहारामधून आवश्‍यक प्रथिने न मिळणा-या रूग्‍णांसाठी प्रोटीन सप्‍लीमेण्‍ट्स एक पर्याय असू शकतात, पण शाकाहारी व्‍यक्‍तींनी आवश्‍यक प्रथिने मिळण्‍यासाठी ओव्‍हो-व्हेजिटेरियन (अंडी खाणारे) बनण्‍याची गरज नाही. आहारतज्ञांनी दिलेल्‍या सल्‍ल्‍याचे पालन करा आणि शाकाहारी राहत दररोज आवश्‍यक प्रथिने मिळवा.


शाकाहारी असलात तरी आवश्‍यक प्रथिने मिळवा अपेक्षा एकबोटे एमएससी. आरडी प्रमुख आहारतज्ञ, नेफ्रोप्‍लस शाकाहारी असलात तरी आवश्‍यक प्रथिने मिळवा अपेक्षा एकबोटे एमएससी. आरडी  प्रमुख आहारतज्ञ, नेफ्रोप्‍लस Reviewed by News1 Marathi on June 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads