Header AD

डोंबिवलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोघे जखमी

 डोंबिवली ( शंकर जाधव ) घरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात वृद्धासह त्याचा मुलगा जखमी झाल्याची घटना मंगळवारी साडे पाच वाजण्याच्या सुमरास ठाकुर्ली पूर्वेकडील म्हसोबा नगर चोळेगाव येथील बैठ्या चाळीत घडली.सुदैवाने घरातील बाकी सदस्य वेळीच घराबाहेर पडल्याने त्याच्या जीवितास हानी पोहचली नाही.मात्र घर जळून खाक झाले.आगीत भाजलेल्या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.       मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाशचंद कुस्तीमिया ( ७० ) आणि अरविंद कुस्तीमिया ( ३२ ) असे यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.अरविंद यांची पत्नी घरात जेवण बनवत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र प्रसंगावधान राखत घरातील सदस्यांनी घराबाहेर धावले. मात्र प्रकाशचंद आणि अरविंद हे दोघे घराला लागलेली आग विझविण्यासाठी आत गेले.
     ।आग विझवताना दोघे भाजले.चाळीत राहणारे पवन चव्हाण आणि काही रहिवाश्यांनी आग विझवण्याच्या प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमक दलाने धाव घेतली.डोंबिवली रामनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली.

डोंबिवलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोघे जखमी डोंबिवलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोघे जखमी Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads