Header AD

भिवंडी तालुक्यातील पडघ्यात चोरट्यांनी महीलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पळवली ; महिलांमध्ये भीतीचे वातावरण..
भिवंडी दि. ४ (प्रतीनीधी ) भिवंडी तालुक्यातील पडघा येथे रस्त्याने ये - जा करणाऱ्या एकट्या दुकट्या महीलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने महीलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


        पडघा न्हावी आळी येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वयोवृद्ध महीला अनुसया किसन गायकवाड या घराशेजारील संतसेना महाराज मंदीरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या .त्यावेळी तेथे दर्शनासाठी आलेल्या अनोळखी इसमाने हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील ४५ हजार किंमतीची सोन्याची माळ चोरून पोबारा केला.


         तर ब्राम्हण आळी येथे राहणाऱ्या गुलाब गणेश भुयाळ या अंगणवाडी सेविका असून मुंबई नाशिक महामार्गावरुन एम.एस.ई.बी.विद्युत केंद्र येथे अंगणवाडीवर जात असताना शेरेकरपाडा रस्त्यालगत मोटार सायकलवरून पाठीमागून आलेल्या हेल्मेटधारी दोन अनोळखी इसमांनी ताई अशी हाक मारली त्यावेळी त्यांनी थांबून मागे बघीतले त्याचवेळी त्याच्यां गळ्यातील ६० हजार किमतीची सोन्याची गरसोळ (माळ) खेचून बोरीवली गावाच्या  दिशेने चोरटे पळुन गेले.


           या दोन्ही घटनांचे गुन्हे पडघा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पोलीसांनी लवकरात लवकर तपास लाऊन दागीने परत मिळवुन देण्याची मागणी दोन्ही महीलांनी केली आहे.पडघ्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दिवसा ढवळ्या महिलांना लुटत आहेत. त्यासाठी पोलीस गस्त वाढवण्यात अशी मागणी माजी सरपंच पराग पाटोळे यांनी केली आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघ्यात चोरट्यांनी महीलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पळवली ; महिलांमध्ये भीतीचे वातावरण.. भिवंडी तालुक्यातील पडघ्यात चोरट्यांनी महीलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पळवली ; महिलांमध्ये भीतीचे वातावरण.. Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads