Header AD

वनविभागाच्या कारवाईच्या निषेधार्त श्रमजीवीचा बिऱ्हाड मोर्चा

 

■पंतप्रधान आवास अनुदानातून बांधलेल्या घरकुलांवर वनविभागाचा हातोडा....कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण तालुक्यातील चौरे म्हसरोंडी या गावातील आदिवासी विधवा महिलेला पंतप्रधान अवास घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेल्या अनुदानातून तयार केलेल्या बांधकामावर वनविभागाने हातोडा चालवीत बेघर करण्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने बिर्‍हाड मोर्चा काढत संबंधित वन अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन परिक्षेत्र वन अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.कल्याण पंचायत समितीने चौरे म्हसरोंडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहत असलेल्या सावित्रीबाई बबन फसाले यांना पंतप्रधान अवास घरकुल योजने अंतर्गत एक लाख २१ हजार रुपयांचे अनुदान दिल्याने त्या जागेवर घर बांधकाम सुरू केले होते. मात्र आठ जून रोजी कल्याण वन परीमंडळातील दहा गाव येथील वनपाल रघुनाथ शेलार व पुनम शिंदे यांनी या आदिवासी महिलेला कुठलीही नोटीस न बजावता उभे करण्यात आलेले घर क्षणार्धात जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे विधवा महिला आपल्या चार लहान मुलांसह  ऐन पावसाळ्यात बेघर झाली आहे. गेल्याच महिन्यात तिचे पतीचे निधन झाले असून वनविभागाच्या आकस्मिक कारवाईने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रमजीवी संघटनेच्या सुमारे पाचशे कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त करून बिर्‍हाड मोर्चा दहागाव पोई वनक्षेत्रपाल कार्यालयावर धडकला.आदिवासी समाजाला नेमून दिलेल्या जागेवर त्यांना हुसकावून लावणे आणि बेघर करणे हा ॲट्रॉसिटी ॲक्ट मध्ये मोडत असून कारवाईत सहभाग घेणाऱ्या दहा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून वनविभागाने सावित्री फसाले यांना घरकुल बांधून द्यावे मौजे चौरे येथील आदिवासी वस्ती कायम करा तसेच दहागाव पोई वनक्षेत्रातील वनविभागाच्या जागेवर झालेले अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळाराम भोईर, राजेश चन्ने यांनी परिक्षेत्र वन अधिकारी कल्याण वाघेरे यांना निवेदनाद्वारे केली आहे आहे.चौरे गावातील विधवा महिला सावित्री बबन फसाले यांना पंतप्रधान अवास घरकुल योजनेअंतर्गत मिळालेले शासकीय अनुदानाची सुमारे एक लाख २१ हजार रुपये त्याचबरोबर पुंजी पुंजी जमा करून घर पूर्णत्वास आल असतानाच दहा गाव येथील वनपाल यांनी कर्मचाऱ्यांना घेत या बांधकामावर कारवाईचा आसूड ओढला. याबाबत श्रमजीवी संघटनेने तोडलेल्या जागेवर या विधवा महिलेला बांधकामाचे सर्व साहित्य लोकवर्गणीतून जमा करून घरकुल नव्याने उभारून देण्याचा मानस व्यक्त केला असून १७ जून रोजी टिटवाळा पोलिसांना बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट  नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस व राजेश चन्ने यांनी दिली आहे.          यासंदर्भात अधिक माहिती घेण्याकरिता कल्याणच्या परिक्षेत्र वन अधिकारी कल्पना वाघेरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. तर  "कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीयाबाबत ग्रामसेवक यांच्याकडून अहवाल मागितला असुन लाभार्थी हा घरापासून वंचित राहणार याबाबत लक्ष देणार आहोत."
वनविभागाच्या कारवाईच्या निषेधार्त श्रमजीवीचा बिऱ्हाड मोर्चा वनविभागाच्या कारवाईच्या निषेधार्त श्रमजीवीचा बिऱ्हाड मोर्चा Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads