Header AD

शासनाने बहुउद्देशीय चक्री वादळ निवारण केंद्रे उभारण्याची मागणी

 

■वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता केली मागणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारण्याची मागणी सुराज्य अभियान केली मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या माध्यमांतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर विषय संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी निर्देशित केला आहे.


महाराष्ट्र शासनाने वारंवार निर्माण होणारा चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांतील एकूण ११  ठिकाणी वर्ष 2019-20 मध्ये बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 42 कोटी 39 लाख रुपयांची तरतूदही केली होतीमात्र ठरलेल्या 18 महिन्यांच्या मुदतीत ही निवारा केंद्र उभारली गेली नाहीत. परिणामी नुकत्याच आलेल्या तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीची प्रचंड हानी झाली आहे.


            घरेफळबागाशेती यांची अतोनात हानी झाली. ठरलेल्या मुदतीत ही बांधकामे झाली असती फना’, ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ अशा एका पाठोपाठ येणार्‍या चक्रीवादळांच्या काळात या निवारा केंद्रांचा मोठा आधार कोकणवासियांना झाला असता. तरी शासनाने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. राज्याच्या महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिवतसेच रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुक्रमे अदिती तटकरेअनिल परबडॉ. उदय सामंत आणि दादा भुसे यांनाही या विषयीचे निवेदन देण्यात आले आहे. 
शासनाने बहुउद्देशीय चक्री वादळ निवारण केंद्रे उभारण्याची मागणी शासनाने बहुउद्देशीय चक्री वादळ निवारण केंद्रे उभारण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि महिला पोलिसांचीही गस्त हवी महिला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वा लाखे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि साध्या वेशातील पोलिसांसह महिला पोलिसांचीही प्रत्येक ठिकाणी गस्त हवी असल्याच...

Post AD

home ads