Header AD

शासनाने मंजूर केलेल्या केडीएमसीत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी भाजपा आमदारांचे आयुक्तांकडे साकडे

 
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : शासनाने नुकताच मंजूर केलेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील नव्या नोकर भरती नियमावली व आकृती बंधा मुळे पालिकेच्या काही कर्मचाऱयांना त्याचा लाभ होणार आहे तर काहींवर अन्याय होणार असल्याने तसेच या आकृती बंधात पालिकेत समाविष्ठ केलेल्या २७ गावातील शेकडो भूमीपुत्रावर विचार न करता त्यांना डावलले गेले आल्याने त्याच्यावर होणाऱ्या अन्याया बाबत भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्तांशी भेट घेत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी  आयुक्तांकडे साकडे  घातले.          कल्याण डोंबिवली महानगर पालिकेसाठी शासनाने नुकताच नवीन सेवा भरती नियमावली व आकृती बंध मंजूर केला आहे या आकृती बंधा मुळे काही कामगार वर्गावर अन्याय होणार असून त्यांना सेवा निवृत्ती पर्यत पदोन्नती मिळणार नसल्याने या आकृती बंधातील अनेक त्रुटी बाबत भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिकेतील भाजपाचे माजी नगरसेवक राहुल दामले,विकास म्हात्रे व अन्या माजी पदाधिकारी यांचा समवेत भाजपा शिष्ठमंडळाने पालिका आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी याच्यांची भेट घेतली व नवीन सेवा भरती नियमावली व आकृती बंध यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.
आयुक्तांनी ही आमदारांनी केलेल्या सूचना गांभियाने लक्षात घेऊन फार मोठी असणारी आकृती बंद असल्यामुळे आपण सांगितलेल्या  सूचनांचा विचार करून आणि येणाऱ्या काळात आवश्यक नुसार बदल करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

शासनाने मंजूर केलेल्या केडीएमसीत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी भाजपा आमदारांचे आयुक्तांकडे साकडे शासनाने मंजूर केलेल्या केडीएमसीत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी भाजपा आमदारांचे आयुक्तांकडे साकडे Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads