Header AD

वाहतूक पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना काळात डॉक्टरपोलीस आणि नर्स यांच्या सोबतच वाहतूक पोलीसांनी ही जीवावर उदार होऊन लोकांची सेवा केली. त्यामुळे कोरोना काळात केलेल्या अतिमहत्वाच्या सेवेसाठी शिवसेना पक्षाचे जय महाराष्ट्र जनरल युनियन व राष्ट्रीय माथाडी कामगार सेना (सलग्न भारतीय कामगार सेना) यांच्या तर्फे डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गीत्ते  आणि  सहपोलीस निरीक्षक राजश्री  शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी कामगार सेनेचे कल्याण-डोंबिवली विधानसभा अध्यक्ष राजेंद्र गोगुरला यांच्या हस्ते 'कोरोना योद्धाचेम्हणून प्रमाणपत्र देउन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रिक्षा चालक संघटनेचे सल्लागार भगवान मोरजकरराजा चव्हाण आणि विजय गांवकर आदी उपस्थित होते.

वाहतूक पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान वाहतूक पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads