Header AD

पळसोली विभागातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

             

        


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या प्रेरणेने प्रभावित होऊन तसेच उत्तम प्रशासक म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वसामान्य जनतेचा आधार बनत आहेत. एक कार्यकुशल नेतृत्व म्हणून सर्वसामान्य लोकांपासून ते सामाजिक राजकिय कार्यकर्ते मान्य करीत आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेत अनेक लोकं प्रवेश करीत आहेत.पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाप्रमुख वसंत लोणे यांच्या नेतृत्वाखालीउपतालुकप्रमुख बंधु जाधवयुवासेना ठाणे जिल्हा सचिव अल्पेश भोईरसंपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण रमेश बांगर, सहकार तालुकाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या उपस्थितीत भाजप पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वेहळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्वास देसले, भाजपा तालुका सचिव आनंता देसले, माजी ग्रा.पं सदस्य ज्ञानेश्वर देसलेविलास देसले, जगदीश देसले, अनंता तिवरे, मच्छिद्र देसले, रामदास देसले, शिवाजी देसलेप्रफुल चौधरी व काकडपाडा येथील माजी ग्रा.पं सदस्य विकास चौधरीकिरण चौधरी यासंह अनेक कार्यकर्ते यांनी जिल्हा शाखा कार्यालय पडघे येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रकाश चौधरी, नितीन देसले, ज्ञानेश्वर देसलेविष्णू चौधरी, गुरुनाथ देसलेसमीर शेलार, मिलिंद चौधरी, गजानन चौधरी हे पळसोली विभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी तालुकाप्रमुख वसंतजी लोणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटनेचे काम करावे असे सूचित केले. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांच्या प्रयत्नाने वासिंद शेरे मुख्य रस्ता (कमानीपासून) ते वेहळे गावापर्यंत आणि  काकडपाडा ते कातकरी वाडी रस्ता या दोन रस्त्यांसाठी ३०५४ अंतर्गत जवळजवळ प्रत्येकी ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची महिती दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून विवीध कामांसाठी कल्याण तालुक्यासाठी  भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.


पळसोली विभागातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश पळसोली विभागातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads