Header AD

भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये स्टेममार्फत नवी पाईप लाईन पाण्याची चिंता मिटणार, खासदार कपिल पाटील यांची माहिती

भिवंडी, दि. ६ (प्रतिनिधी )  :  भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी स्टेममार्फत नवी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या कामासाठी २८ कोटी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विशेषत: भिवंडी शहराबाहेरून जाणाऱ्या या पाईपलाईनच्या माध्यमातून ४० वर्षापूर्वी मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे ३४ गावांसह ग्रामीण भागाची पाणी चिंता मिटणार आहे, अशी माहिती भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी दिली.            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या धोरणानुसार प्रती माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मात्र, भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील ३४ गावांना सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील ३४ गावांना १९७९-८० मधील अंदाजे ३५ हजार लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या गावांमधील लोकसंख्या वाढत असून, २०३१ मध्ये अंदाजे १२ लाख लोकसंख्या होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गावनिहाय पाणी आरक्षण वाढविण्याची खासदार कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने मागणी केली जात होती. त्याचबरोबर पाईपलाईनचा व्यास वाढविणे व निकामी झालेल्या पाण्याच्या टाक्या पुन्हा बांधण्याकडे स्टेम प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.              तसेच ४० वर्षांतील औद्योगिकीकरण व दळणवळणाच्या सोयीनुसार वाढलेल्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा गरजेचा असल्याने पाणीपुरवठ्यात वाढ करावी, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक व ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन केली होती. या प्रश्नावर जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांनीही सातत्याने स्टेमकडे पाठपुरावा केला होता. अखेर या गावांच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाने यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली.          स्टेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पात नव्या पाईपलाईनसाठी १८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी २८ कोटी ८० लाखांची तरतूद भिवंडीतील ग्रामीण भागासाठी करण्यात आली आहे.
स्टेम प्राधिकरणाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार, नवी पाईपलाईन भिवंडी शहराबाहेरून जाणार आहे. माणकोलीहून दापोडा, राहनाळ, कालवार, डुंगे, खारबाव, बंगला पाडा, मालोडी, पाये आणि वडूनवघर ते कांबा दरम्यान जाणाऱ्या पाईपलाईनमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायमची दूर होईल, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.
भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये स्टेममार्फत नवी पाईप लाईन पाण्याची चिंता मिटणार, खासदार कपिल पाटील यांची माहिती भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये स्टेममार्फत नवी पाईप लाईन पाण्याची चिंता मिटणार, खासदार कपिल पाटील यांची माहिती Reviewed by News1 Marathi on June 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads