Header AD

डॉ . श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिना निमित्त भाजपाच्या नौपाडा मंडलाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

 ठाणे, प्रतिनिधी  ;  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनानिमित्त आमदार संजय जी केळकर व आमदार निरंजन डावखरे (भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शना खाली नौपाडा मंडलात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता महिला मोर्चा नौपाडा मंडला तर्फे सरस्वती सेकंडरी व ब्राह्मण विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.            नौपाडा मंडल व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने विविध सोसायटी मध्ये प्लास्टिक संकलन करण्यात आले तसेच या संस्थेस प्लास्टिक संकलनासाठी डसबीन देण्यात आले तसेच स्मृतिदिनानिमित्त विविध गृहनिर्माण सोसायटी मध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत डसबीन वाटप करण्यात आले.            या प्रसंगी नगरसेवक नारायण पवार,सुनेश जोशी नगरसेविका मृणाल पेंडसे प्रतिभा मढवी नौपाडा मंडल सरचिटणीस राजेश ठाकरे नौपाडा महिला मोर्चा अध्यक्ष विशाखा कणकोसे महिला मोर्चा शहर पदाधिकारी माधुरी मेटांगे स्नेहा शिंदे संहिता देव शिवानी गोखले रक्षा यादव मंडल पदाधिकारी शिल्पा उतेकर सई कारूळकर शहर चिटणीस किशोर गुणिजन व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती
डॉ . श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिना निमित्त भाजपाच्या नौपाडा मंडलाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन डॉ . श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिना निमित्त भाजपाच्या नौपाडा मंडलाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads