Header AD

भाजपा शिक्षक आघाडीचा बीएलओ ड्युटीला तीव्र विरोध

 

■कल्याण तहसीलदार यांना दिले निवेदन शिक्षकांना शालेय कामे करू देण्याची मागणी....कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  शिक्षकांना शालेय कामे करू देण्याची मागणी करत भाजपा शिक्षक आघाडीने बीएलओ ड्युटीला तीव्र विरोध केला असून याबाबत त्यांनी कल्याण तहसीलदारांना निवेदन दिले आहे. यावेळी प्रदेश सहसंयोजक विकास पाटीलकोकण विभाग संयोजक एन. एम. भामरेकल्याण जिल्हा संयोजक विनोद शेलकरसचिव सुभाष सरोदेसहसंयोजक ज्ञानेश्वर घुगे आदी उपस्थित होते.१५ जून पासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्या आधीपासूनच इ.१० वी व इ.१२ वीचा निकाल व प्रवेश प्रक्रियाइ.५वी ते इ.९ वी पुनर्प्रवेश प्रक्रिया आणि ऑनलाईन शिक्षण अशी तिहेरी दैनंदिन शिक्षण कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्याचप्रमाणे प्रवासाची असुविधाशिक्षकांची रिक्तपदांची वाढती संख्या आणि शिक्षक भरतीबंदी यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त शैक्षणिक कामांचाजबाबदारीचा  प्रचंड बोझा वाढलायं. त्यामुळे शिक्षक कमालीच्या मानसिक दबावाखाली व तणावाखाली वावरत आहेत.           कोरोना काळातही जीवाची पर्वा न करताकुठलंही प्रशिक्षण व वैद्यकीय सुविधा वा साधनसामग्री नसतांना देखील कोरोना योध्दयाप्रमाणे शिक्षकांनी कोवीड सेंटरकुटुंब सर्वेक्षणआरोग्य सर्वेक्षणपोषण आहार वितरणरहदारी नियंत्रणचेकपोस्टरेशन दुकानदारु दुकान व किराणा दुकानावर ड्युटी केवळ शासकीय आदेशान्वये इमानेइतबारे पार पाडली आहेत.ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण व प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे हे शिक्षकांचं प्रथम प्राधान्याचं व जबाबदारीचं काम आहे. त्याकामासाठी पुरेसा व आवश्यक वेळ मिळणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होवू नयेते शिक्षणापासून वंचित राहू नयेतशिक्षणाच्या प्रवाहापासून दूर फेकले जाऊ नयेत यासाठी कल्याण जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  सुनील कोलते कार्यकारी दंडाधिकारी यांनी यावेळी या निवेदनाचा स्वीकार केला.

भाजपा शिक्षक आघाडीचा बीएलओ ड्युटीला तीव्र विरोध भाजपा शिक्षक आघाडीचा बीएलओ ड्युटीला तीव्र विरोध Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads