Header AD

परदेशी जाणाऱ्या कर्मचारी, विद्यार्थी आणि टोकियो ऑलिम्पिक मधील सहभागी खेळाडूं साठी लसी करणाचे विशेष सत्र नागरिकांनी लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन

 



ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्यावतीने नोकरीच्या निमित्ताने जाणारे  कर्मचारी, शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि टोकियो ऑलिम्पिकमधील सहभागी खेळाडूंसाठी माजिवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात 'वॉक इन' पध्दतीने लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले असून संबंधितांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.



          परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी वर्ग तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने 'वॉक इन' पद्धतीने लस देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात 'वॉक इन' पध्दतीने सकाळी 11.00  ते 1.00 या वेळेत लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.



          या विशेष सत्रांमध्ये परदेशी जाणाऱ्या नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर कोविन अँपवर सर्व कागदपत्रांच्या नोंदी करूनच लस देण्यात येणार आहे. यामध्ये कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात येत असून पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनंतर आणि 84 दिवसांपूर्वी घेतला जाऊ शकतो. तरी महापालिका क्षेत्रातील परदेशी जाणाऱ्या कर्मचारी, विद्यार्थी आणि टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडूंनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.    


परदेशी जाणाऱ्या कर्मचारी, विद्यार्थी आणि टोकियो ऑलिम्पिक मधील सहभागी खेळाडूं साठी लसी करणाचे विशेष सत्र नागरिकांनी लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन परदेशी जाणाऱ्या कर्मचारी, विद्यार्थी आणि टोकियो ऑलिम्पिक मधील सहभागी खेळाडूं साठी लसी करणाचे विशेष सत्र नागरिकांनी लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व येथे ,  आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून    रविवारी  ' ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी '  उप...

Post AD

home ads