Header AD

अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा

 कल्याण , प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचल्याचे निदर्शनास आले. 

आज अतिरिक्त आयुक्त तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुनील पवार यांनी महापालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील 201 प्रमुख ठिकाणी कार्यान्वित असलेल्या 551 सीसीटीव्‍ही कॅमे-याचा माध्यमातून पाणी साचण्याच्या जागा अवलोकून तेथील समस्यांचे निराकारण करणेबाबत संबंधित अधिका-यांना त्यांनी सुचना दिल्या.

 

अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads