Header AD

ठाण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते लसीकरणाचा शुभारंभ

 ठाणे , प्रतिनिधी ;  ठाणे शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने आणि रेमंड कंपनी यांच्या सहकार्याने ऑनलाईन नोंदणीकृत १८ ते ४४ वयोगटासाठी सुरू करण्यात आलेल्या 'ड्राईव्ह ईन' लसीकरणाचा शुभारंभ आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.        यावेळी उप महापौर सौ.पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेता अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय साहाय्य समिती अध्यक्षा सौ. निशा पाटील, शिवसेना गटनेता दिलीप बारटक्के, राष्ट्रवादी गटनेता नजीब मुल्ला, नगरसेविका सौ. कल्पना पाटील, रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, उप आयुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.         ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाच्या व्यापकता वाढावी यासाठी रेमंड कंपनी येथे आजपासून 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुरु करण्यात आले असून आज पहिल्याच दिवशी ३०० कोव्हीशील्डचे डोस देण्यात आले.       'ड्राईव्ह ईन' लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणी केलेल्या १८ ते ४४  वयोगटातील नागरीकांनाच लस देण्यात येत आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. या केंद्रावर सकाळी ११ ते ४ या वेळेत लसीकरण सुरु राहणार असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते लसीकरणाचा शुभारंभ ठाण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते लसीकरणाचा शुभारंभ Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads