Header AD

४५वर्षांवरील दिव्यांगांसाठी प्राधान्याने लसीकरण सर्व केंद्रांवर होणार लसीकरण - महापौर – आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णयठाणे , प्रतिनिधी  ;  ठाणे शहरातील ४५ वर्षांवरील दिव्यांगांना लसीकरण केंद्रांवर प्रतिक्षा करावी लागू नये यासाठी त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.


         लसीकरण केंद्रांवर दिव्यांग बांधवांची गैरसोय होवू नये तसेच त्यांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेतला असून तशा सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.


        सद्यःस्थितीत शासनाकडून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरत्या थांबविण्यात आले असून ज्याक्षणी या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास शासनाची मान्यता मिळेल त्यावेळी स्तनदा माता व  दिव्यांगांना या दोन्ही गटातील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.


       सदरचा निर्णयामुळे शहरातील ठाणे महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षांवरील  स्तनदा माता आणि दिव्यांग बांधवांचे लसीकरण प्राधान्याने होणार आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.                                

४५वर्षांवरील दिव्यांगांसाठी प्राधान्याने लसीकरण सर्व केंद्रांवर होणार लसीकरण - महापौर – आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय ४५वर्षांवरील दिव्यांगांसाठी प्राधान्याने लसीकरण सर्व केंद्रांवर होणार लसीकरण -  महापौर – आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय Reviewed by News1 Marathi on June 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads