Header AD

भिवंडीतील पूर्णा मार्गावरील नाल्यात वाहताना महिला थोडक्यात बचावली...





भिवंडी दि 18 (प्रतिनिधी ) कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहर आणि  ग्रामीण  भागात पाणी साचले  असताना  भिवंडी तालुक्यातील पूर्णा -  राहणाळ रोडवरील   एका नाल्यात महिला पडल्याने त्या महिलेला वाचवण्यासाठी  त्याच रोडवरून   प्रवास करणार्‍या नागरिकांना धाव घेऊन त्या महिलेला   सुखरूप बाहेर काढले आहे, आणि तीचे प्राण वाचवले आहे . 




             मात्र तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे,भिवंडी काल्हेर मार्गावर असलेल्या पूर्णा येथील पेट्रोल पंपा बाहेर रोडवरून   ती  महिला  साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना महिलेचा अंदाज चुकल्याने महिला थेट  नाल्यात पडल्याची घटना घडली  आहे. तसा  कारमधून जाणाऱ्या व्यक्तीने मोबाईल व्हिडीओ  काढून व्हायरल केला आहे, त्यामुळे कोणत्याही रोडवर पाणी सचल्यास नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन  समाजसेवी संघटनाकडून  करण्यात येत आहे...
भिवंडीतील पूर्णा मार्गावरील नाल्यात वाहताना महिला थोडक्यात बचावली... भिवंडीतील  पूर्णा मार्गावरील नाल्यात वाहताना महिला थोडक्यात बचावली... Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads