Header AD

एन.सी.एल.ए.टी न्यायालयाने एनआरसी जागेच्या मूल्यांकना बाबत फटकारले जागेचे सरकारी मुल्यांकन किती, केला सवाल

 कल्याण , कुणाल म्हात्रे  :  रेयॉन उत्पादनात आशिया खंडात अग्रेसर असलेली कंपनी २००९ साली बंद पडली. सुमारे ३८०० कामगारांच्या देण्यांचा विषय प्रलंबित असून एनआरसी कंपनी विरोधात एन.सी.एल.ए.टी न्यायालयात कामगार संघटनेचा लढा सुरू असून कामगारांना अदानी उद्योग समूहाने ११० कोटी रुपये दिल्याचे न्यायालयाला सांगितले असता जागेचे सरकारी मूल्यांकन किती आहे याची विचारणा करून सुरू असल्याच्या खटल्याचा निकाल न देता पुढील माहितीची तारीख दिली आहे.


एनआरसी कारखान्याने ताब्यात असलेली तीनशे पन्नास एकर जमीन अदानी समूहाला विकली होती. साडेतीन ते चार हजार कायमस्वरूपी काम करीत असणारा कामगार वर्गाला कारखाना बंद पडल्याने त्यांच्या देणे दिले नसल्याने गेल्या अकरा वर्षांपासून कामगार संघटना आंदोलन करीत असल्याने तुटपुंजी रक्कम घेण्यास कामगार वर्गाने नकार दिला आहे. सहा महिन्यापासून कामगार वसाहतीत जुन्या चाळी, इमारती, बंगले, क्लब आदी पडीक झालेल्या अदानी समूहाकडून बुलडोजर चालवून तोडक कारवाईचा सपाटा सुरू ठेवला होता. यामुळे कामगार वसाहतीत प्रचंड असंतोष निर्माण होत पोलिसांसमवेत मोठ्या प्रमाणात हमरीतुमरी झाल्याने संघर्षमय वातावरण निर्माण झाले होते. या विरोधात रस्ता रोको करून ठिय्या आंदोलन देखील केले होते.


ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदेवंचित आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकरआमदार विश्वनाथ भोईरआमदार राजू पाटील व अन्य राजकीय पुढाऱ्यांनी आंदोलन कर्त्या कामगारांची भेट घेतली होती. मंत्रालयात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कामगार नेते तसेच समूहाची देणी संदर्भात बैठक ही लावली होती मात्र या मधून कामगार वर्गाच्या हाती काहीच लागले नाही.


आजच्या सरकारी बाजार भावात जमिनीचे हजारो करोड रुपयांची मूल्यांकन असून अदानी समूह साडेतीन ते चार हजार कामगारांना केवळ ११० कोटी रुपये वाटप करीत असल्याने कामगारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. महाराष्ट्र जनरल कामगार युनियन चे अध्यक्ष भूषण सामंतआयटकचे उदय चौधरी व स्टाफ युनियन याबाबत अदानी विरोधात न्यायालयात लढा देत आहेत.


एप्रिल व मे महिन्याच्या दरम्यान एन सी एल ए टी न्यायालयाने विकास गुप्ता यांना एनआरसी कारखान्याच्या जागेचे सरकारी दराने मूल्यांकन सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र अदानी समूहाने दोन मे रोजी न्यायालयात सरकारी मूल्यांचे सादरीकरण न केल्याने न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले अदानी समूहाच्या वकिलाने ११० कोटी रुपयांपैकी काही रक्कम कामगारांनी स्वीकारली असल्याचे न्यायालयाला सांगून बाकी रक्कम बँकेत जमा असल्याचे सांगताच न्यायालयाने जागेची किंमत किती आहे अशी विचारणा करून निर्णय रोखून धरत येत्या २८ जून ची तारीख देण्यात आली आहे.


एनआरसी मध्ये कार्यरत असणाऱ्या आयटक युनियन तसेच महाराष्ट्र जनरल कामगार युनियन भूमिपुत्र संघर्ष समिती महिला मंडळ आदींनी अदानी उद्योग समूहाच्या भूलथापांना कामगार वर्गाने बळी पडू नये असे आवाहन केले आहे.एनआरसी मधील जागेचा सरकारी मुल्यांकन किती याबाबत एन.सी.एल.ए.टी न्यायालयाने फटकारल्याने कामगार युनियनची भूमिका रास्त असल्याचे दिसून येत असून यामुळे कामगारांना आशेचा किरण दिसत असल्याची प्रतिक्रिया कामगार प्रतिनिधी रामदास वळसे पाटील यांनी दिली.

एन.सी.एल.ए.टी न्यायालयाने एनआरसी जागेच्या मूल्यांकना बाबत फटकारले जागेचे सरकारी मुल्यांकन किती, केला सवाल एन.सी.एल.ए.टी न्यायालयाने एनआरसी जागेच्या मूल्यांकना बाबत फटकारले जागेचे सरकारी मुल्यांकन किती, केला सवाल Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads