Header AD

नागरिकांनी, व्यापारी वर्गाने कचरा टाकण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करावा महापौर प्रतिभा विलास पाटील




भिवंडी , प्रतिनिधी  ;  शहर कचरामुक्त करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली फिरवण्यात येणार असून प्रत्येक प्रभाग समिती निहाय सकाळी तीन फेऱ्या व रात्रीच्या वेळी तीन फेऱ्या मुख्य बाजाराच्या मार्गाने करण्यात येणार आहेत.  व्यापारी, दुकानदार यांनी त्यांच्या दुकानातील कचरा ट्रॅक्टर ट्रॉली मध्येच टाकावा असे आवाहन महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी सर्व नागरिकांना केले आहे, कचरामुक्त भिवंडी शहर या योजनेचा एक भाग म्हणून सर्वत्र ट्रॅक्टर ट्रॉली फिरवण्यात येणार आहेत.



        या  ट्रॅक्टर ट्रॉली चे उद्घाटन महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील बोलत होते,यावेळी उपमहापौर इमरान मोहम्मद अली खान, आरोग्य उपायुक्त दीपक झिंजाड, आरोग्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, आरोग्य विभाग प्रमुख हेमंत गुळवी, प्रभाग समिती 5 चे  प्रभाग अधिकारी गिरीश घोष्टेकर , जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले तसेच सर्व आरोग्य निरीक्षक, अन्य आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



      या ट्रॅक्टर ट्रॉली प्रत्येक प्रभाग समिती मधून फिरणार  असून या मधून साधारणपणे  बाजार परिसरातून ट्रॅक्टर ट्रॉली फिरणार असून या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये लोकांनी कचरा टाकून सहकार्य करावे, या   ट्रॅक्टर ट्रॉली मुळे  भिवंडी कचराकुंडीमुक्त  होण्यास मदत होणार आहे. भिवंडी शहर कचरा कचरा कुंडी मुक्त करायचे असेल तर अशा प्रकारच्या ट्रॅक्टर ट्रॉली या शहरात रात्रीच्या वेळी फिरवण्यात येणार असून दुकानदार, व्यापारी वर्गाने त्यांच्या दुकानात जमा होणारा कचरा हा ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये टाकून महानगरपालिकेत सहकार्य करावे शहर कचराकुंडी मुक्त करावे  असे आवाहन महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी याप्रसंगी केले आहे.

नागरिकांनी, व्यापारी वर्गाने कचरा टाकण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करावा महापौर प्रतिभा विलास पाटील नागरिकांनी, व्यापारी वर्गाने कचरा टाकण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करावा महापौर प्रतिभा विलास पाटील Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads