Header AD

नूतन विद्यालयात योग दिवस साजरा

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आंतरराष्ट्रीय योग दिन नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण येथे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर  सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. संस्थेच्या चिटणीस वेदपाठकमुख्याध्यापिका सय्यदसांस्कृतिक प्रमुख पवळे, भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



क्रीडा शिक्षक शिंदे मॅडम व भागीत सर यांच्या मार्गदर्शनाने निवडक विद्यार्थीपालकशिक्षक यांनी सूर्यनमस्कार आणि योग मुद्रा केल्या. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते. योग ही भारताची प्राचीन परंपरा असून बुद्धी आणि शरीराची एकात्मता यांचे प्रतीक आहे. केवळ एकच दिवस योग करण्यासाठी नसून प्रत्येक दिवस योगमुद्रा करणे ही उत्तम सवय आहे. हीच प्रेरणा घेऊन प्रत्येक विद्यार्थी पालक शिक्षक प्रांगणातून बाहेर पडला.

नूतन विद्यालयात योग दिवस साजरा नूतन विद्यालयात योग दिवस साजरा Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads