Header AD

धर्मांतर बंदी करण्यासाठी केंद्रीय कायद्या सह हवाला आणि काळा पैशावर प्रतिबंध आवश्यक

 

■अधिवक्ता अश्‍विनी उपाध्यायसर्वोच्च न्यायालयधर्मांतराची वाढती समस्या : उपाय काय आहेत ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : धर्मांतरबंदी करण्यासाठी केंद्रीय कायद्यासह हवाला आणि काळा पैशावर प्रतिबंध आवश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती’ आयोजित धर्मांतराची वाढती समस्या : उपाय काय आहेत ?’, या ऑनलाईन विशेष परिसंवादात बोलत होते. हा कार्यक्रम समितीच्या Hindujagruti.org या संकेतस्थळाद्वारेतसेच यू-ट्यूब आणि ट्वीटर यांद्वारे ३८०० हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.धर्मांतराची समस्या भारताच्या स्वातंत्र्यपूर्वकाळापासून चालू आहे. परकीय आक्रमकांनी भारताची केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हेतर भारताला गझवा-ए-हिंद’ (इस्लामी राज्य) बनवण्यासाठी आक्रमणे केली आहेत. आज धर्मांतरासाठी विदेशांतून हवाला’ आणि काळे धन’ यांच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर पैसा येत आहे. केवळ मिशनरी-धर्मांधांनाच नव्हेतर नक्षलवादीमाओवादीफुटिरतावादीआतंकवादी या सर्वांना हवालाच्या माध्यमांतून पैसा सर्वत्र पोहोचवला जातो. 


त्यामुळे देशाला सर्वांत मोठा धोका हवाला’ आणि काळे धन’ यांमुळे निर्माण झाला आहे. धर्मांतरावर खर्‍या अर्थाने बंदी आणायची असेलतर या हवाला’ आणि काळे धन’ बंद करण्यासाठी १०० च्या वरील नोटा चलनात आणू नयेतसेच धर्मांतराच्या विरोधात कठोरतम कलम भारतीय दंड संहितेमध्ये वाढवावे. त्यात १० ते २० वर्षे कारावास अन् संपत्ती जप्तीचा अंतर्भाव असावा असे देखील अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी सांगितले.या वेळी बोलतांना उत्तरप्रदेश येथील इंडिक अकॅडमीचे समन्वयक विकास सारस्वत म्हणाले कीधर्मांतरबंदी कायदा अनेक राज्यांत असूनही एकाही मिशनरींवर कठोर कारवाई केलेली नाही. अन्य बेकायदेशीर कृत्यांमध्ये सापडल्यावरही धर्मांधांवर कारवाई करण्याची हिंमत सरकार आणि पोलीस दाखवत नाहीत. धर्मांतर कसे करावेयासाठी विदेशांत विविध पद्धतीचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते. अशांचा सामना करण्यासाठी केवळ धर्मांतरबंदी कायद्यावर विसंबून चालणार नाही. कायद्यातून पळवाटा काढल्या जातात. त्यापेक्षा हिंदु धर्माचे मिशनरी निर्माण केले पाहिजेत. धर्मांतराला उत्तर प्रतिधर्मांतरानेच दिले पाहिजे.तर धर्मांतरामुळे देशातील ७ राज्यांमध्ये आज हिंदु अल्पसंख्यांक झालेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात एक लाखांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केल्याचे ख्रिश्‍चन मिशनरी उघडपणे सांगत आहेत. एका धर्मांतर झालेल्या व्यक्तीकडून आंध्र प्रदेशात १०० हून अधिक मूर्ती भंजनाच्या घडना घडलेल्या आहेत. एका ठिकाणी ख्रिश्‍चन पास्टर विजय म्हणाला कीहिंदूंना आमची अडचण होत असेलतर आम्हाला वेगळे राष्ट्र द्या. यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते. या सर्व धर्मांतरावर मूलभूत उपाय म्हणून हिंदूंना आपल्या धर्माचे शिक्षण देणेहा आहे. यासाठी समितीने अनेक ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू केले आहेत. त्यातून हिंदूंना जागृत आणि संघटित केले जात आहे. एकदा जागृत झालेला हिंदु धर्मांतरीत होत नाही असे हिंदु जनजागृती समितीचे आंध्र प्रदेश समन्वयक चेतन जनार्दन यांनी सांगितले.

धर्मांतर बंदी करण्यासाठी केंद्रीय कायद्या सह हवाला आणि काळा पैशावर प्रतिबंध आवश्यक धर्मांतर बंदी करण्यासाठी केंद्रीय कायद्या सह हवाला आणि काळा पैशावर प्रतिबंध आवश्यक Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads