Header AD

जैव विविधता उदयानाच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्‍या जवळ जाण्याची संधी आंबिवली टेकडीवर आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण

 कल्याण , प्रतिनिधी  :  जैव विविधता उदयानाच्या माध्य मातून नागरिकांना निसर्गाच्‍या जवळ जाण्याची संधी प्राप्त झाली आहेअसे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज कल्याण मधील आंबिवली परिसरात वृक्षारोपण करते समयी केले. आंबिवली टेकडीवर आय नेचर फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पुढील काळात निर्मिली जाणारी विविध उदयाने विदयार्थ्यांसाठी संशोधनास आणि विरंगुळयाचे केंद्र होईलअशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, प्रख्यात फुलपाखरु तज्ञ व आय नेचर फाऊंडेशचे संचालक आयझॅक किहिमकरआयनेचर फाऊंडेशनच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी यांचे मार्फत करंजाबहावा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.     कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात होणाऱ्या रिंग रोड बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात महापालिकेने एमएमआरडीए व वनविभागाच्या सहकार्याने आंबिवली टेकडीवर यापूर्वीच १५ हजार झाडे लावली आहेत. यामुळे टेकडी संवर्धनासह रम्य नैसर्गिक वातावरणाचा आनंद नागरिकांना लुटता येणार आहे. सोलर सिस्टिम आणि ड्रीप इरिगेशन यामुळे २ वर्षाची झालेली झाडे आता बहरली असून आंबिवली टेकडीवर या झाडांची अधिक गर्द वनराई होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली शहर अभियंता सपना कोळी आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सीएसआर फंडासाठी केलेल्या आवाहनाला आता प्रतिसाद मिळाला आहे.आय नेचर फाऊंडेशन यांनी ३ वर्षासाठी या परिसरात उद्याने विकसित करण्यासाठी महापालिकेबरोबर करार केला असून त्यासाठी डी.सी.बी. बँकेकडून सीएसआर फंडातून सुमारे ३.५ कोटींचे अर्थसहाय याकामी मिळणार आहे. ४० एकराच्या या जागेत बर्ड गार्डनबॅट गार्डनबटरफ्लाय गार्डनबी गार्डनमेडिसिन गार्डनराशी वन व छोटा जलाशय अशा प्रकारची ७ उद्याने विकसित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे १० हजार वृक्षांची लागवडही केली जाणार आहे. आंबिवली टेकडीवर  नेचर ट्रेलची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक लोकांना प्रशिक्षण दिले जाणार असून या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.कल्याणच्या आसपास अशाप्रकारे कुठलेही पार्क व वाईल्‍ड लाईफ सॅक्च्युरी नसल्यामुळे कल्याणमध्ये विकसित होत असलेल्या या जैव विविधता उद्यानाला विशेष महत्त्व आहे. यावेळी घकव्य विभागाचे उपायुक्त रामदास कोकरेकार्यकारी अभियंता सुभाष पाटीलअ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंतसहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अनेक वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

जैव विविधता उदयानाच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्‍या जवळ जाण्याची संधी आंबिवली टेकडीवर आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण जैव विविधता उदयानाच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्‍या जवळ जाण्याची संधी आंबिवली टेकडीवर आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण  Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads