Header AD

अभिनेत्री नयन पवार यांनी केले शिवाजी मंदिर रंगकर्मींना अन्न धान्याचे वाटप
मुंबईत, दि. १९  : -   गतवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. राज्यातील नाट्य, चित्रपटगृह बंद असल्याने बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावसर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा, अभिनेत्री नयन पवार यांच्यातर्फे अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. 
         सरकार कडून वेळेवर मदत मिळत नाही. अश्या वेळेस त्यांनी काय करावे. संपूर्ण नाटय व्यवसायावर अवलंबून असलेले हे नाट्यकर्मी, त्यांनी आपले कुटुंब कसे राखायचे, जगवायचे. नाटकाचा प्रयोग असला तरच त्यांना पैसे मिळतात. नाटयनिर्माता, संस्था, कलावंत काही दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात दिला. मात्र काही महिने वगळता लॉक डाऊन सातत्याने चालू आहे. यावर्षी फेब्रुवारी पासून लॉकडाऊन असल्याने नाट्य, चित्रपटगृहे बंद आहेत.
            त्यामुळे राज्यातील अनेक बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा, अभिनेत्री नयन पवार यांच्यावतीने शिवाजी मंदिर या नाट्यगृहातील बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत, समाजसेवक रत्नाकर खानविलकर, दिलीप दळवी उपस्थित होते.

अभिनेत्री नयन पवार यांनी केले शिवाजी मंदिर रंगकर्मींना अन्न धान्याचे वाटप अभिनेत्री नयन पवार यांनी केले शिवाजी मंदिर रंगकर्मींना अन्न धान्याचे वाटप Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads