Header AD

ब्रह्मांड कट्टयावर चतुरस्त्र कलाकार नितीन श्री यांचे प्रथम पुण्य स्मरण व कलाकारांना शिधा व गृहपयोगी वस्तुचें वाटप
ठाणे , प्रतिनिधी  :  सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणारा ब्रह्मांड कट्टा आपल्या कलाकारांनादेखील तितक्याच आपुलकीने व माणुसकीने जपत आला आहे. याचे साक्षात उदाहरण म्हणजे ब्रह्मांड *ब्रह्मांड कट्टयावर चतुरस्त्र कलाकार नितीन श्री यांचे प्रथम पुण्यस्मरण व कलाकारांना शिधा व गृहपयोगी वस्तुचें वाटप.


          ठाणे: सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणारा ब्रह्मांड कट्टा आपल्या कलाकारांनादेखील तितक्याच आपुलकीने व माणुसकीने जपत आला आहे. याचे साक्षात उदाहरण म्हणजे ब्रह्मांड कट्टयाचे हरहुन्नरी व चतुरस्त्र गायक कलाकार व ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कलासंस्कार या संस्थेचे विश्वस्त दिवंगत नितीन श्री यांच्या प्रथम स्मृतिदिनाप्रित्यर्थ ब्रह्मांड कट्टयावर दोन श्रद्धांजलिपर कार्यक्रम २९ जून रोजी ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.          कलासंस्कार संस्थेच्या अध्यक्षा वर्षा गंद्रे यांनी आपल्या मुलासमान असणार्‍या नितीन श्री यांना 'स्मृति सुमनांची श्रद्धांजलि' हा आगळावेगळा आदरांजलीपर कार्यक्रम अर्पण केला. कलासंस्कार तसेच ब्रह्मांड कट्टयाच्या ज्येष्ठ व बालकलाकारांनी मिळून गायन, नृत्य, काव्य, किस्से अशा विविध कलांच्या माध्यमातून नितीन श्री यांना श्रद्धांजलि अर्पण केली. आठवणींना उजाळा देणारा संवाद साधताना सर्वचजण हळवे झाले होते. कार्यक्रमाच्याअंती नितीन श्री यांची छायाचित्रे व त्यांनी गायलेल्या गाण्यांची झलक पाहताना सर्वांचे डोळे पाणावले.


     

        त्यानंतर ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांच्या कल्पनेतुन साकारलेला 'स्वरांजली' हा हिंदी गीतांचा वाद्यवृंद नितीन श्री यांच्या आठवणीत सादर करण्यात आला. ब्रह्मांड कट्टयाचे गायक सावनकुमार सुपे, प्रशांत गुरव व गायिका सीमा चक्रवर्ती यांनी नितीन श्री यांची आवडती गाणी सादर करुन आदरांजली वाहिली. सीमा यांच्या 'तुम पुकार लो' या आर्त सादेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.        त्यानंतर त्यांनी गायलेल्या 'आपकी नजरोने समझा', 'तु जहाँ जहाँ चलेगा', 'तेरा जाना' अशा सुमधुर गीतांनी वातावरण भारावून गेले. त्यानंतर कार्यक्रमाला आपल्या स्वरांचे कोंदण चढवत सावनकुमार यांनी लाजवाब गायकीद्वारे आपल्या मित्राला मधुर गीतांची श्रद्धांजलि वाहिली. सावनकुमार यांनी ' रिमझिम गिरे सावन', 'तुम अगर साथ देने का', 'आदमी जो कहता है' अशा अनेक गीतांमधुन आपल्या चतुरस्त्र गायकीचे दर्शन घडविले.          त्याच्या भावनोत्कट गीतांमधुन नितीन श्री यांच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रशांत यांनी 'बडे अच्छे लगते है' हे तरल गीत सुंदररित्या सादर केले. 'वो जब याद आये', 'आदमी मुसाफ़िर है', 'ये दोस्ती' अशा अनेक द्वंद्व गीतांचा खजिना उलगडत आठवणींचा सोहळा रंगत गेला. 'नाम गुम जाएगा' या गीताने सावनकुमार व सीमा यांनी नितीन श्रींच्या व्यक्तिमत्वालाच जणू सलाम केला.       प्रशांत यांनी ओघवत्या भाषेत सहज सुंदर निवेदन करत नितीन श्रींच्या नाना आठवणी उलगडल्या व चाहत्यांसमोर त्यांची छबीच उभी केली. संतोष मोहिते (कि बोर्ड ), रितेश पाटील (तबला ढोलकी), गजानन विश्वकर्मा (ऑक्टोपॅड) या वादकांनी उत्तम साथ देता गीतांची शोभा वाढवली.           ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी सर्व कलाकारांचे आभार मानले. कोरोना काळात आर्थिक विवंचनेत अडकलेल्या वाद्यवृंद कलाकरांना त्यांनी शिधावाटप केले. अशाप्रकारे ब्रह्मांड कट्टयाने पुनश्च मानवतेचे दर्शन घडवत आपल्या लाडक्या कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण केली. हरहुन्नरी व चतुरस्त्र गायक कलाकार व ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कलासंस्कार या संस्थेचे विश्वस्त दिवंगत नितीन श्री यांच्या प्रथम स्मृतिदिनाप्रित्यर्थ ब्रह्मांड कट्टयावर दोन श्रद्धांजलिपर कार्यक्रम २९ जून रोजी ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.          कलासंस्कार संस्थेच्या अध्यक्षा वर्षा गंद्रे यांनी आपल्या मुलासमान असणार्‍या नितीन श्री यांना 'स्मृति सुमनांची श्रद्धांजलि' हा आगळावेगळा आदरांजलीपर कार्यक्रम अर्पण केला. कलासंस्कार तसेच ब्रह्मांड कट्टयाच्या ज्येष्ठ व बालकलाकारांनी मिळून गायन, नृत्य, काव्य, किस्से अशा विविध कलांच्या माध्यमातून नितीन श्री यांना श्रद्धांजलि अर्पण केली. आठवणींना उजाळा देणारा संवाद साधताना सर्वचजण हळवे झाले होते. कार्यक्रमाच्याअंती नितीन श्री यांची छायाचित्रे व त्यांनी गायलेल्या गाण्यांची झलक पाहताना सर्वांचे डोळे पाणावले.


   

       त्यानंतर ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांच्या कल्पनेतुन साकारलेला 'स्वरांजली' हा हिंदी गीतांचा वाद्यवृंद नितीन श्री यांच्या आठवणीत सादर करण्यात आला. ब्रह्मांड कट्टयाचे गायक सावनकुमार सुपे, प्रशांत गुरव व गायिका सीमा चक्रवर्ती यांनी नितीन श्री यांची आवडती गाणी सादर करुन आदरांजली वाहिली. सीमा यांच्या 'तुम पुकार लो' या आर्त सादेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.           त्यानंतर त्यांनी गायलेल्या 'आपकी नजरोने समझा', 'तु जहाँ जहाँ चलेगा', 'तेरा जाना' अशा सुमधुर गीतांनी वातावरण भारावून गेले. त्यानंतर कार्यक्रमाला आपल्या स्वरांचे कोंदण चढवत सावनकुमार यांनी लाजवाब गायकीद्वारे आपल्या मित्राला मधुर गीतांची श्रद्धांजलि वाहिली. सावनकुमार यांनी ' रिमझिम गिरे सावन', 'तुम अगर साथ देने का', 'आदमी जो कहता है' अशा अनेक गीतांमधुन आपल्या चतुरस्त्र गायकीचे दर्शन घडविले. त्याच्या भावनोत्कट गीतांमधुन नितीन श्री यांच्या आठवणी ताज्या झाल्या.          प्रशांत यांनी 'बडे अच्छे लगते है' हे तरल गीत सुंदररित्या सादर केले. 'वो जब याद आये', 'आदमी मुसाफ़िर है', 'ये दोस्ती' अशा अनेक द्वंद्व गीतांचा खजिना उलगडत आठवणींचा सोहळा रंगत गेला. 'नाम गुम जाएगा' या गीताने सावनकुमार व सीमा यांनी नितीन श्रींच्या व्यक्तिमत्वालाच जणू सलाम केला. प्रशांत यांनी ओघवत्या भाषेत सहज सुंदर निवेदन करत नितीन श्रींच्या नाना आठवणी उलगडल्या व चाहत्यांसमोर त्यांची छबीच उभी केली. संतोष मोहिते (कि बोर्ड ), रितेश पाटील (तबला ढोलकी), गजानन विश्वकर्मा (ऑक्टोपॅड) या वादकांनी उत्तम साथ देता गीतांची शोभा वाढवली.           ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी सर्व कलाकारांचे आभार मानले. कोरोना काळात आर्थिक विवंचनेत अडकलेल्या वाद्यवृंद कलाकरांना त्यांनी शिधावाटप केले. अशाप्रकारे ब्रह्मांड कट्टयाने पुनश्च मानवतेचे दर्शन घडवत आपल्या लाडक्या कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण केली.

ब्रह्मांड कट्टयावर चतुरस्त्र कलाकार नितीन श्री यांचे प्रथम पुण्य स्मरण व कलाकारांना शिधा व गृहपयोगी वस्तुचें वाटप ब्रह्मांड कट्टयावर चतुरस्त्र कलाकार नितीन श्री यांचे प्रथम पुण्य स्मरण व कलाकारांना शिधा व गृहपयोगी वस्तुचें वाटप Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads