Header AD

दलित मित्र अण्णा रोकडे यांचा ८३ वा वाढदिवस पारस बाल आश्रमात साजरा

 कल्याण , कुणाल  म्हात्रे : दलित चळवळीतील जेष्ठ नेते आणि आरपीआयचे राष्ट्रीय नेते अण्णा रोकडे यांचा ८३ व वाढदिवस टिटवाळा येथील पारस बाल आश्रमात साजरा करण्यात आला.              वाढदिवसाच्या दिवशी कोणताही वायफळ खर्च न करता अनाथ आणि निराधार असलेल्या मुलांसोबत अण्णा रोकडे हे आपला वाढदिवस साजरा करत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी टिटवाळा येथील म्हस्कळ गावात असणाऱ्या पारस बाल आश्रमात आपल्या कुटुंबियांसमवेत आणि आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांसोबत जात वाढदिवस साजरा केला. यावेळी रोकडे यांनी आपला बराचसा वेळ या मुलांसोबत घालवला. या मुलांना स्नेहभोजन देत स्वतः देखील मुलांसोबत जेवत आपला आनंद व्यक्त केला.             या ठिकाणी असलेली अनेक मुलं हि अनाथ आणि निराधार आहेत. तर काहींच्या पालकांच्या वादात या मुलांना याठिकाणी सोडण्यात आले आहे. तर काही मुले हि बेवारसपणे मिळून आली होती. या सर्वांचा या आश्रमात गुंजाळ दाम्पत्य सांभाळ करत आहे. या आश्रमाला शासनाच्या वतीने कोणतेही अनुदान मिळत नसल्याने आपण याठिकाणी वाढदिवस साजरा केला असल्याची माहिती आरपीआयचे जेष्ठ नेते आणि दलित मित्र अण्णा रोकडे यांनी दिली.यावेळी माजी शिक्षण मंडळ सभापती महादेव रायभोळे, माजी नगरसेवक भीमराव डोळस, आरपीआय युवा मोर्चाचे संग्राम मोरे, संतोष जाधव, अंबादास सोनावणे, अर्चना कदम, सरस्वती राक्षे, प्रशांत कासारे, रितिक रोकडे आदीजण उपस्थित होते.    

दलित मित्र अण्णा रोकडे यांचा ८३ वा वाढदिवस पारस बाल आश्रमात साजरा दलित मित्र अण्णा रोकडे यांचा ८३ वा वाढदिवस पारस बाल आश्रमात साजरा Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads