Header AD

डोंबिवली शहर मनसेच्या वतीने १०५३ फुलझाडांचे वाटप राज ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त पर्यावरण पूरक उपक्रम
कल्याण, कुणाल  म्हात्रे  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे नेते तथा आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाने मनसे डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीकर नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला. यंदा राज ठाकरेंचा ५३ वा वाढदिवस असल्याने १०५३ फुलझाडांचे वाटप मनसे डोंबिवली शहरातर्फे करण्यात आले.गेली दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असताना हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊन पुर्वीप्रमाणेच लोकांचे जीवन उत्साहाने भारलेले, टवटवीत, सुगंधी व रंगीबेरंगी व्हावे यासाठी गुलाब, मोगरा, जास्वंद अशी मनमोहक फुलझाडे वाटुन लोकांच्या जीवनात या दिवसानिमित्ताने चैतन्य जागृत होऊन नैराश्य व मरगळ दूर व्हावी तसेच या माध्यमातून झाडे लावा,झाडे जगवा हा सामाजिक संदेश घरोघरी जावा असा हेतू ठेवून सदर उपक्रम राबविल्याचे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी सांगितले.डोंबिवलीकर नागरीकांनी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी केवळ १ तासात तब्बल १०५३ रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मनसे शहरसंघटक योगेश रोहिदास पाटील यांनी विशेष सहकार्य केले. 

डोंबिवली शहर मनसेच्या वतीने १०५३ फुलझाडांचे वाटप राज ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त पर्यावरण पूरक उपक्रम डोंबिवली शहर मनसेच्या वतीने १०५३ फुलझाडांचे वाटप राज ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त पर्यावरण पूरक उपक्रम Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads