Header AD

महापालिकेच्या ब आणि ई प्रभागात अनाधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई
कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या  निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील ब प्रभाग क्षेत्रातील कल्याण स्पोर्टस क्लबच्या मागील बाजूस चालू असलेल्या १० चाळीच्या रुमचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई ब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी महापालिकेचे पोलिस कर्मचारी व महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे १० कामगार यांच्या मदतीने आज केली.ई प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व येथील देसलेपाडानांदीवली येथे चालू असलेले जी+ 3 या इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई आज केली. सदर कारवाई ई प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागातील २०  कर्मचारी व १०  पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच १  जेसीबी४ कॉम्प्रेसरगॅस कटर यांचे सहाय्याने करण्यात आली.

महापालिकेच्या ब आणि ई प्रभागात अनाधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई महापालिकेच्या ब आणि ई प्रभागात अनाधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई  Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads