Header AD

पदोन्नती मधील आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार शरद पवार यांची भेट


 


पदोन्नती मधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर जोरदार आंदोलन महाविकास आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी सरकार - गौतम सोनवणे


मुंबई दि. 7 - पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांची भेट घेणार आहेत.   पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकार ने त्वरित घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकार ची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका असा गंभीर ईशारा आज ना.रामदास आठवले यांनी दिला. 


               पदोन्नती मधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे दि. 1 जून ते 7 जून आंदोलन सप्ताह राज्यभर पाळण्यात आला. आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. 

 

              आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला. यावेळी ऍड. अभयाताई सोनवणे; रमेश गायकवाड; रमेश गौड; कृष्णा गौड; दिलीप व्हावळे; अशोक कांबळे; संदीप शिंदे; हरिबा कोंडे; भीमराव सवातकर; अनिल कोकणे; परशुराम माळी; नवनाथ बनसोडे; ओमप्रकाश यादव; तारबाई वानखडे; रमेश डाके; प्रशांत मोहिते; राजेंद्र जाधव; राजेश खंडागळे; रामराव खंडागळे; भागवत सोनवणे;  विनय दवणेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. 


              महाविकास आघाडी सरकार च्या काळात मराठा आरक्षण घालविले; ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्यात आले; दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण रोखण्यात आले आहे त्यामुळे हे सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. या सरकार मध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा शिवसेनेचा की राष्ट्रवादी चा ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले. 


             पदोन्नती मधील अरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बोरिवली तहसील आणि अंधेरी तहसील कार्यालयावर रिपाइं तर्फे तीव्र  आंदोलन करण्यात आले. अंधेरी तहसील कार्यालयावर मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;  जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.  


           पदोन्नती मधील अरक्षणाच्या मागणीसाठी आज कल्याण मध्ये जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव;  तालुका अध्यक्ष रामा कांबळे; रमेश बर्वे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात आटपाडी तहसील कार्यालयावर विशाल काटे आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. राज्यात अनेक जिल्ह्यात रिपाइं तर्फे पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. 

पदोन्नती मधील आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार शरद पवार यांची भेट पदोन्नती मधील आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार शरद पवार यांची भेट Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads