Header AD

विनामूल्य लसीकरण शिबिरां बाबत शिवसेनेचा पक्ष पातीपणा नगरसेवक कृष्णा पाटील


महापौर कार्यालया तून होते फायनल यादी दोन वेळा मागणी करूनही प्रशासना कडून टाळा टाळ...ठाणे, प्रतिनिधी  ;  दि. 29 ; ठाणे मनपा प्रभाग क्र. 11 मध्ये लसी करण शिबीर आयोजित करण्या संदर्भात मे महिन्या पासून आता पर्यंत दोनवेळा परवानगी मागूनही ठाणे मनपा प्रशासना कडून जाणीव पूर्वक टाळाटाळ केली जात आहे. तसेच शिवसेने कडून याबाबत पक्ष पातीपणा केला जात असून महापौर कार्यालया तून शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका सौ. नंदा पाटील यांनी केला आहे.
             नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका सौ. नंदा पाटील यांनी ते ज्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत त्या प्रभाग क्र. 11 मध्ये ठाणे शहर कोरोना मुक्त करण्या करिता हातभार म्हणून 4 मे व 16 जून 2021 असा दोनवेळा ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागा कडे पत्रव्यवहार केला.          यात त्यांनी ठाणे महापालिका आरोग्य विभाग व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे या त्यांच्या संस्थेतर्फे प्रभाग क्र. 11 मधील 4 ठिकाणी विना मूल्य लसीकरण शिबीर आयोजित करण्या बाबत विनंती केली. संपूण दिवसाच्या या शिबिरामध्ये किमान 5,000 लसींचा विनामूल्य पुरवठा व कर्मचारी वर्गाची व्यवस्था  करावी अशी विनंतीही केली. आयुक्तां कडेही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला.
           वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद न मिळाल्याने नगरसेवक कृष्णा पाटील यांनी अखेर आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेऊन     त्यांच्याशी चर्चा केली. महापौर हे आपल्या मनाने यादी तयार करून आरोग्य विभागा कडे देतात आणि यात जाणीवपूर्वक पक्षपातीपणा केला जात आहे. ज्या ज्या लोक प्रतिनिधींनी मागणी केली असेल त्यांनी केलेल्या अर्जांची पोहोच तारीख पहा म्हणजे त्यातून सर्व प्रकार तुमच्या निदर्शनास येईल असे आयुक्तांना सांगून आपण यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करून आपल्या कडून सहकार्याची अपेक्षा बाळगतो असे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सांगितले.             लसीकरणा संदर्भात शिवसेना पक्षाकडून पक्ष पातीपणा केला जात असून महापौर कार्यालया कडून लसीकरणाची यादी फायनल केली जाते आणि मोफत लसीकरण शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिले जाते. दोनवेळा मागणी करून प्रशासना कडून जाणीव पूर्वक टाळाटाळ केली जात आहे. पहिल्या पत्रानंतर आयुक्तांनी आदेश दिले तरी महापालिका प्रशासना कडून त्यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखविली गेली.            तसेच वैद्यकीय अधिकारी देवडीकर मॅडम आणि खुशबू मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोफत लसीकरण शिबिरांची यादी महापौर कार्यालयातून केली जाते आणि त्याप्रमाणे आम्हाला काम करावे लागते असे सांगितले असल्याचे कृष्णा पाटील यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे केंद्र सरकार कडून मिळणाऱया मोफत लसीकरणाचा  शिवसेना राजकीय फायदा उठवीत असल्याचा आरोप नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे.  

विनामूल्य लसीकरण शिबिरां बाबत शिवसेनेचा पक्ष पातीपणा नगरसेवक कृष्णा पाटील विनामूल्य लसीकरण शिबिरां बाबत शिवसेनेचा पक्ष पातीपणा नगरसेवक कृष्णा पाटील Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads