Header AD

विस्टीऑन ' कडून गरीब गरजू दोनशे कुटुंबांना किराणा वाटप

 


चिपळूण (प्रतिनिधी) :  सध्या कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात हाहाकार सुरु आहे . अश्या स्थितीत कित्येकांच्या हाताला काम नाही . दैनंदिन रोजगार मिळवून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वांचा रोजगार थांबला आहे . त्यामुळे हातावर पोट असलेल्या परिवाराला उदरनिर्वाह भागवण्याची चिंता आहे . 


अश्या स्थितीत विस्टीऑन टेक्नीकल आणि सर्विसेस सेंटर प्रा.लि पिंपरी चिंचवड पुणे या कंपनीचे अध्यक्ष मा.श्री.आशिष भाटीया आणि सहाय्यक मॅनेजर मा.श्री सिद्धार्थ बंगार यांनी व किनारा वृद्ध व मतीमंद सेवा ट्रस्ट कामशेत पुणे यांच्या सहकार्याने , श्री राजीव शिंदे यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिपळूण यांच्या कार्यतत्परतेणे कोळकेवाडी , पेढांबे आणि अलोरे गावातील २०० गरीब गरजू कुटुंबांना कोरोनाचे नियम पाळून घर पोच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले . 


त्यामध्ये आटा ( गहू पीठ ) ५ कि.ग्र . , तांदूळ २ कि.ग्र . , मुग डाळ १ कि.ग्र . , तेल १ लि.साखर १ कि.ग्र . , बेसन पीठ १ कि.ग्र . , मीठ १ कि.ग्र . कांदा लसून मसाला आणि विदयार्थ्यांना बिस्कीट इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव श्री दीपक मोने , तालुका अध्यक्ष श्री प्रकाश गांधी . सचिव श्री विनायक गुरव , कोळकेवाडी गावच्या सरपंच सौ.पल्लवी शिंदे , उपसरपंच श्री सचिन मोहिते , श्री श्रीकांत निगडे , श्री प्रकाश कदम इत्यादी सदस्य उपस्थित होते . सदर प्रसंगी सर्वच मान्यवरांनी “ विस्टीऑन " कंपनीचे अध्यक्ष मा.श्री.आशिष भाटीया आणि सहाय्यक मॅनेजर मा.श्री सिद्धार्थ बंगार याचे या सहकार्याबद्दल खूप आभार मानले . 


किनारा वृद्ध व मतीमंद सेवा ट्रस्ट कामशेत पुणे यांच्याही सहकार्याबद्दल खूप धन्यवाद दिले . तसेच श्री राजीव शिंदे आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिपळूण यांच्याही सहकार्याबद्दल आभार मानले . उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सदस्य सौ . प्रभावती पाटील , श्री सुनिल उबळेकर , श्री देवराव शिसोदे , श्री युगेश कदम , श्री विजय शिंदे , श्री प्रदीप ढगे , श्री गौतम जाधव इत्यादी शिक्षक सहकारी तसेच वाहतूक सौजन्य – राणे सुपर मार्केट आर.एल.राणे , श्री रुपेश राणे , आणि सुरेश बोलाडे यांचे सहकार्य लाभले .

विस्टीऑन ' कडून गरीब गरजू दोनशे कुटुंबांना किराणा वाटप विस्टीऑन ' कडून गरीब गरजू दोनशे कुटुंबांना किराणा वाटप Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads