Header AD

झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे - खासदार कपिल पाटील

 

■केडीएमसीच्या वतीने उंबर्डे येथे वृक्षा रोपण .. कल्याण , कुणाल  म्हात्रे  : झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहेवृक्ष लागवडीमुळे हा परिसर एक चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकेलअसे उद्गार खासदार कपिल पाटील यावेळी यांनी आज काढलेकल्याण डोंबिवली महानगरपालिका‍ आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने आज सकाळी मुथा कॉलेज परिसरात वृक्षारोपण करते वेळी ते बोलत होते. महापालिकेला मिळालेल्या कोविड इनोव्हेशन पुरस्काराबाबत आयुक्त हे सत्कारास पात्र आहेतसिमेंटच्या जंगलात हिरवळ तयार केल्याबाबतही त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले. यावेळी खासदार कपिल पाटीलआमदार विश्वनाथ भोईर,  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीशहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संदीप भंडारी यांचे हस्ते जांभुळकरंजाफणस अशा रोपांची लागवड करण्यात आली. संपूर्ण उंबर्डेगांधारे व बारावे परिसरातमहापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने बेलउंबर,  करंजेचिंचफणस,  कोकमजांभूळ,रक्तचंदनआंबाबिब्बा व पिंपळ अशा सुमारे ७०० देशी -बहुगुणी रोपांची लागवड करण्यात आली असून त्यामुळे सदर परिसर काही कालावधीनंतर सदाहरित होण्यास मदत होणार आहे.आधारवाडी येथील डंम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर आता बारावे येथे घनकचरा प्रकल्प सुरु झाला असल्याने तेथील परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिकांचा होणारा विरोध व रोष कमी करण्यासाठी सदर प्रकल्पाभोवती दाट झाडांचा हरित पट्टा निर्माण करुन तसेच तेथे सुवासिक झाडांची लागवड करून परिसर सुगंधी करायचा दृष्टीकोनातून महापालिकेचे सचिव तथा मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपणा-यांना नागरिकांना व संस्थांना आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले.बारावे घनकचरा प्रकल्प परिसरात इनरव्हिल क्लबरॉबिनहुड ग्रुपउल्हास जामदारमॉर्निंग वॉक ग्रुप यांच्या सहकार्याने पारीजातरातराणी, मोगराकामिनीजाई-जुईमधूमालतीलिलीलेमन ग्रास, वाळासोनटक्का इ. सुगंधी रोपटयांची स्वखर्चातून‍ आणि श्रमदानातून लागवड करण्यात आली आहे. बारावे डंम्पिंग ग्राऊंड परिसरात विविध प्रकारच्या सुगंधी रोपांची लागवड केल्यामुळे आता सदर परिसर सुगंधी फुलांच्या सुवासाने आता दरवळणार आहे.

झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे - खासदार कपिल पाटील झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे - खासदार कपिल पाटील Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads