Header AD

मंदिरात चोरी करणारे दोन आरोपी तासा भरात पोलिसांच्या जाळयात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांची कारवाई




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मंदिरात चोरी करणारे दोन आरोपी अवघ्या तासाभरात पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी हि कारवाई केली आहे. इरफान खान आणि फैजल खान अशी या दोन्ही चोरट्यांचे नावं असून दोघं मुंबईतील गोवंडी या परिसरात राहणारे आहेत.



कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात दोन चोरट्यांनी हनुमानाच्या मंदिरातून तांबा पितळेच्या वस्तू चोरल्या. चोरी केल्यानंतर हे दोन्ही चोरटे रस्त्यावरून जात असताना गस्तीवर असलेल्या कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. या दोघांच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांनी त्यांना हटकले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पितळेच्या मुर्त्या, भांडी आढळली. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने या दोन्ही चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेतलं.



 काही वेळापूर्वी पोलीस स्थानकात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात चक्की नाका परिसरातील एका हनुमानाच्या मंदिरात चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी या मंदिराचे सीसीटीव्ही तपासले असता हे चोरटे हे तेच दोन चोरटे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

मंदिरात चोरी करणारे दोन आरोपी तासा भरात पोलिसांच्या जाळयात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांची कारवाई मंदिरात चोरी करणारे दोन आरोपी तासा भरात पोलिसांच्या जाळयात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांची कारवाई Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads