Header AD

भिवंडीतील काल्हेर कशेळी येथील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना बेदम मारहाण...

 
भिवंडी दि 17 (प्रतिनिधी )  भिवंडी तालुक्यातील ठाणे सीमे लगत असलेल्या कशेळी काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीए प्रशासनाने अनाधिकृत ठरवीत कारवाई सुरू केली आहे .मागील पंधरा दिवसां पासून या भागातील इमारती तोडण्याचे काम सुरू असून त्यामुळे येथे फ्लॅट खरेदी केलेल्या कुटुंबियांचे डोक्यावरील छत हिरावले जाणार आहे .          आज त्या ठिकाणी स्थानिक आमदार शांताराम मोरे ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे हे  नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी घटनास्थळी आले असता त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना संतप्त जमावाने एमएमआरडीए अधिकारी प्रधान यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केली आहे .यामुळे तूर्तास येथील कारवाई थांबली आहे .           संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असून एम एम आर डी ए क्षेत्र अंतर्गत भिवंडी तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीचा समावेश आहे . काल्हेर कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या प्रमाणावर निवासी इमारतींचे बांधकाम झालेले आहे .यापैकी बहुतांश इमारती या अनधिकृत असून त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे .तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.               त्याप्रमाणे  एक जून पासून या ठिकाणी इमारती तोडण्याचं काम सुरू असताना काही इमारतींना अवघ्या चोवीस तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यास येथील स्थानिक राहणा-या नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.या ठिकाणी दोनशेहून अधिक इमारतींना नोटीस बजावण्यात आली असून येथे तब्बल हजारो कुटुंब या कारवाईमुळे बेघर होणार आहेत.                 कशेळी काल्हेर या परिसरात ठाण्या पेक्षा निम्म्या किमतीत फ्लॅट मिळत असल्याने नागरिकांचा ठाणे बाळकुम येथील दोस्ती ग्रुप बिल्डर च्या 50 लाख रुपयांच्या फ्लॅट ला ग्राहक मिळत नसल्याने ते ठाणे येथील राजकीय व्यक्तींना हाताशी धरून ही कारवाई फक्त काल्हेर कशेळी या भागातच करीत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी केला आहे.          येथील इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागा एन ए झालेल्या खाजगी जागा आहेत त्यांची परवानगी ग्रामपंचायतीने दिली असून त्यासाठी मुद्रांक शुल्क भरून त्याची खरेदी नागरीकांनी केली असून त्यासाठी बँकांकडून अनेकांनी कर्ज घेतले आहेत त्यांना देशोधडीला लावण्याचे काम एमएमआरडीए अधिकारी करीत असल्याचे सांगत यानंतर आम्ही आत्मदहन आंदोलन करू परंतु कारवाई होऊ देणार नाही असा इशारा देवानंद थळे यांनी दिला आहे .
भिवंडीतील काल्हेर कशेळी येथील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना बेदम मारहाण... भिवंडीतील  काल्हेर कशेळी येथील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना बेदम मारहाण... Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads