Header AD

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त नाहर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये बेड चार्जेस फक्त ५३ रुपयांत

डोंबिवली ( शंकर जाधव ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि विभाग अध्यक्ष  दिनेश हिरामण पाटील यांच्या माध्यमातून  १४  ते २१ जुन या कालावधीत डोंबिवली पूर्वेकडील नाहर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलमधे ५३ रुपये बेड चार्जेस ( डॉक्टर, नर्सिंग, आर. एम. ओ. चार्जेस सहीत) आकारले जाणार आहे.          गरजु व्यक्तींनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.याबाबत व्यवस्थापक अरुण जांभळे म्हणाले, कोरोनाने अवघ्या जगात कहर माजवला आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर लॉकडाउनमुळे अनेकांनी आपल्या नोकर्या गमवल्या.           आजारपण अंगावर काढली. यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.तर संयोजक डॉ. कुणाल मारुती गायकर, अरुण रामचंद्र जांभळे यांनी  कस्तुरी आशीष बिल्डिंग, दुसरा मजरा कल्याण शिळ रोड व्यंकटेश पेट्रोल पंप जवळ डोंबिवली पुर्व येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त नाहर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये बेड चार्जेस फक्त ५३ रुपयांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त नाहर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये  बेड चार्जेस फक्त  ५३ रुपयांत Reviewed by News1 Marathi on June 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads