Header AD

कपिल पाटील फौंडेशनच्या सशुल्क लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कपिल पाटील फौंडेशनच्या वतीने कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या  सशुल्क लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापुढील काळात कल्याण शहराबरोबरच बदलापूर आणि भिवंडीत लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येतीलअशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.



राज्य सरकारने १८ ते २९ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाला स्थगिती दिली आहे. मात्रया वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. लघुउद्योगसेवा क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातही तरुणांची संख्या लक्षणीय आहे. मात्रहा घटक लसीकरणापासून वंचित राहिला होता. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील नागरीकांकडून लसीकरण शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. 



त्यानुसार खासदार कपिल पाटील यांनी चिकणघर येथील मंगेशी बॅक्वेट हॉलमध्ये सशुल्क लसीकरण शिबिर भरविले होते. या शिबिराचे उद्घाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवारभाजपाचे शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रेशुभा पाध्ये आदींची उपस्थिती होती.



कल्याण-डोंबिवली शहरात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्रज्यांना खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून लस घ्यायची आहेत्यांना या पाच दिवसांच्या शिबिरातून लस उपलब्ध होईल. कल्याणमधील नागरीकांच्या मागणीनुसार शहराच्या विविध भागात लवकरच शिबिरे आयोजित केली जातील. 



कल्याणमधील जास्तीत जास्त नागरीकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहेअसे खासदार कपिल पाटील यांनी नमूद केले. आगामी काळात बदलापूर व भिवंडी येथे शिबिर घेण्यात येतीलअसे त्यांनी सांगितले. या शिबिरात कोरोना नियमावलीचे पालन करून पद्धतशीरपणे नागरीकांना आगाऊ वेळ कळवून लसीकरण करण्यात येत आहे त्याबद्दल नागरीकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

कपिल पाटील फौंडेशनच्या सशुल्क लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद कपिल पाटील फौंडेशनच्या सशुल्क लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads