Header AD

पदोन्नती मधील आरक्षणा साठी मुलुंड तहसीलदार कार्यलयावर रिपब्लिकन पक्षाचे निदर्शने आंदोलनमुंबई दि. 3  ;-  कर्नाटक सरकारने मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने  पदोन्नती मध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली. 


              पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज  मुलुंड तहसीलदार कार्यलयावर  ईशान्य मुंबई जिल्ह्यातर्फे  रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने आंदोलन  जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड आणि मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश शिलवंत यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर; राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव; दादासाहेब झेंडे; अजित रणदिवे; तानाजी गायकवाड;  राजेश सरकार; अशोक निकम; सुरेश कांबळे; आदींची उपस्थिती होती.            मराठा समाजाच्या आरक्षणाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला आहे. अनेक वर्षे रिपब्लिकन पक्षाने मराठा आरक्षणाला आणि ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मंडळ आयोगाच्या शिफारशी ओबीसींना  लागू कराव्यात यासाठी रिपब्लिकन पक्षाने लढा दिला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार च्या काळात मराठा आरक्षण गेले आहे आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. त्यामुळे नाराज समाजाला खुश करण्यासाठी दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची  राजकीय खेळी राज्य सरकार ने खेळू नये असे आवाहन रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.

 

            पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार  दि. 1 जून पासून राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. आज मुलुंड मध्ये काल बांद्रा येथे उद्या चेंबूर  पांजरापोळ येथे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात आज  अहमदनगर पिंपरी चिंचवड जळगाव  भडगाव आदी अनेक ठिकाणी  रिपाइं तर्फे  पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आंदोलन  करण्यात आले . 

पदोन्नती मधील आरक्षणा साठी मुलुंड तहसीलदार कार्यलयावर रिपब्लिकन पक्षाचे निदर्शने आंदोलन पदोन्नती मधील आरक्षणा साठी मुलुंड तहसीलदार कार्यलयावर रिपब्लिकन पक्षाचे निदर्शने आंदोलन Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads