Header AD

राष्ट्रवादीच्या रोजगार मेळाव्यात ३०० हून अधिक जणांना मिळाला रोजगार

 

■कोरोना महामारीत नोकरी गेलेल्यांना मिळाला आधार....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना महामारीत लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळले असून, यामध्ये नागरिकांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यातून ३०० हून अधिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे.         ॲड. संभाजी पाटील यांची जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हा अध्यक्षा सोनिया धामी व उल्हासनगर महानगरपालिका सभागृहनेते भरत गंगोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली २६ व २७ जुन रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन शांतीनगर परिसरात करण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सदरचा उपक्रम हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे राबवला गेला.      या मेळाव्यात ४०० ते ४५० लोकांनी नोकरीसाठी अर्ज केले होते. यापैकी सुमारे ३००  हुन अधीक लोकांना जॉईनिग लेटर देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन १४१ विधानसभा अध्यक्ष ॲड. विक्रांत पाटील यांनी केले होते. यावेळी  डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. अमोल मोळवडेशहर संघटक योगेश काळेमहासचिव रोशन सोलनकारब्लॉक कार्याध्यक्ष कन्हैया निकंबेब्लॉक उपाध्यक्ष संजय देसलेपॅनल अध्यक्ष योगेश पाटीलवॉर्ड अध्यक्ष चेतन निकंमवॉर्ड अध्यक्ष अमोल हिवाळेअरविंद हिवाळे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या रोजगार मेळाव्यात ३०० हून अधिक जणांना मिळाला रोजगार राष्ट्रवादीच्या रोजगार मेळाव्यात ३०० हून अधिक जणांना मिळाला रोजगार Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads