Header AD

दानशूर प्रल्हाद म्हात्रे यांची डोंबिवली तील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील ३५ कलावंताना मदत

डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवलीचे दानशूर व्यक्तीमत्व तथा मनसे डोंबिवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे  यांनी त्यांच्या कार्यालयात डोंबिवलीतील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील ३५ कलावंतासाठी दोन महीने पुरेल एवढे जिवनावश्यक वस्तूंचे केले वाटप व प्रत्येक कलावंताला रोख एक हजार रुपये  अशी मदत केली.तसेच कलावंतांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुध्दा म्हात्रे यांच्या वतीने ठेवण्यात आला होता.त्यावेळी कलाकारांनी संगीतमय कार्यक्रम सादर केल्याने प्रत्येक कलाकाराला  सादरकरणासाठीही म्हात्रे यांनी  मानधन दिले.             म्हात्रे यांनी  सर्वच कलाकारांना आपल्या कार्यालयात बोलावुन स्वागत केले.विशेष म्हणजे महाराष्ट्राचे हास्यसम्राट जॉनी  रावत यांनी  उपस्थिती दर्शविली होती.कलाकारांच्या  प्रति प्रेम व कलाकारांबद्दल असलेला अभिमान म्हात्रे  नेहमीच दाखवुन देत असतात असे यावेळी कलाकारांनी सांगितले.तर म्हात्रे यांनी केलेल्या मदतीबाबत उपस्थित कलाकारांनी आभार मानत त्यांना पुष्पगुच्छ दिले.यावेळी प्रसिद्ध निवेदक प्रविण(शिवा)गायकवाड, निर्माता-वादक केतन कापडणे यांचा विशेष सहभाग होता.
दानशूर प्रल्हाद म्हात्रे यांची डोंबिवली तील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील ३५ कलावंताना मदत दानशूर प्रल्हाद म्हात्रे यांची  डोंबिवली  तील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील ३५ कलावंताना मदत Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads