Header AD

अतिवृष्टी काळात दुर्घटना टाळण्यासाठी केडीएमसीची होर्डिंग्स निष्कासनाची कारवाई
कल्याण , प्रतिनिधी  : अतिवृष्टी काळात दुर्घटना टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने होर्डिंग्स निष्कासनाची कारवाई सुरु करण्यात आली आहे. ९  ते १२  जून दरम्यान अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानूसार दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने सोमवारी रात्री कल्याण शिळरोड वरील दुभाजकांमध्ये असलेली ७  व इतर ३ अशी १० होर्डिंग्स मोकळी केली.             मंगळवारी दिवसभरात कल्याण मधील ड प्रभाग क्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांनी मालमत्ता विभागाच्या सहकार्याने तसेच महापालिका पोलिस अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी१ हायड्रा व १ गॅस कटर चा वापर करुन तिसगाव नाका येथील २५ २०  चौ.फुटाचे १ होर्डिग आणि नितिन राज हॉटेल समोरील १५  १८ चौ.फुटाचे १  होर्डिग निष्कासीत करण्याची धडक कारवाई केली.

अतिवृष्टी काळात दुर्घटना टाळण्यासाठी केडीएमसीची होर्डिंग्स निष्कासनाची कारवाई अतिवृष्टी काळात दुर्घटना टाळण्यासाठी केडीएमसीची होर्डिंग्स निष्कासनाची कारवाई  Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads