Header AD

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका : विजेचे खांब, रस्त्यावरील झाडे यांच्यापासून दूर रहा महापौर - महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
ठाणे, प्रतिनिधी  : शहरात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून येत्या तीन दिवसात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहावे तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.


       

            अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्या नंतर कालपासून शहरात जोरदार पावसाला सुरु झाली असून येत्या तीन दिवसात देखील मुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, पाऊस सुरु असताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी थांबावे, पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास विजेचे खांब व झाडाखाली उभे राहू नये तसेच आपली वाहने रस्त्यावर झाडाखाली उभी न करता सुरक्षित ठिकाणी पार्किग करावीत. या दरम्यान मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.


               

           दरम्यान ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सून कालावधीत आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री - १८०० २२२ १०८ व हेल्पलाईन - ०२२ २५३७१०१० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका : विजेचे खांब, रस्त्यावरील झाडे यांच्यापासून दूर रहा महापौर - महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका : विजेचे खांब, रस्त्यावरील झाडे यांच्यापासून दूर रहा महापौर - महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads