Header AD

हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांची महिना भराच्या उपचारा नंतर कोरोनावर मात
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेत राहणारे हिंदू महासभेचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रमोद जोशी यांनी महिनाभर उपचार घेत कोरोनावर मात केली आहे.           कल्याण डोंबिवली शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या बहुतांशी कमी झाली आहे. राज्यसरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन केल्याने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत कोरोनाची दुसरी लाट तेजीत असताना कल्याण पश्चिमेत राहणारे हिंदू महासभेचे ५८ वर्षीय पदाधिकारी प्रमोद जोशी (गुरुजी) यांना मागील महिन्यात ८ मे ला कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती जास्त खालवल्याने त्यांना उपचारासाठी कल्याण पश्चिमेतील लाल चौकी येथील मनपाच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.   प्रमोद जोशी यांना याठिकाणी दाखल केले तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेवल ७० च्या आसपास असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हॉस्पिटलमधील डॉ. संदीप इंगळे, डॉ. अशोक, डॉ. अतिक आणि डॉ. अजहर यांच्या देखरेखीखाली त्यांना वेंटीलेटर एनआयवी सपोर्टवर ठेवण्यात आले. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी एक महिन्याहून अधिक वेळ लागला.प्रमोद जोशी १० जून रोजी पूर्णपणे बरे होत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आर्ट गॅलरी कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात आले आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतांना त्यांनी आर्ट गॅलरी कोविड सेंटरमधील सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांचे आभार मानत डॉक्टर देवाचे दुसरे रूप असतात हे मी अनुभवलं असल्याची प्रतिक्रिया दिली.

हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांची महिना भराच्या उपचारा नंतर कोरोनावर मात हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांची महिना भराच्या उपचारा नंतर कोरोनावर मात Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads